मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा प्रश्न जटिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:49 AM2019-03-10T05:49:07+5:302019-03-10T05:53:37+5:30

दक्षिण आशिया सर्वाधिक प्रदूषित; ग्रीनपीस, आयक्यू एअर व्हिज्युअलचा अहवाल

The question of air pollution in cities like Mumbai, Thane is complex | मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा प्रश्न जटिल

मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा प्रश्न जटिल

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : धूळ, कारखान्यांसह वाहनांतून निघणारा धूर, बांधकामांतून वातावरणात पसरणारे कण आणि वृक्षांचे कमी होत जाणारे प्रमाण; अशा अनेक घटकांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. ग्रीनपीस आणि आयक्यू एअर व्हिज्युअल या पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार, दक्षिण आशियाची सर्वाधिक प्रदूषित विभाग म्हणून नोंद झाली आहे.

जगात गुरुग्राम या शहराची सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंद करण्यात आली असून, हे शहर उत्तर भारतातील नवी दिल्लीलगतच्या दक्षिण पश्चिमेकडे वसलेले आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांतील वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसागणिक जटिल होत असून, यावर उपाययोजना करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

ग्रीनपीस आणि आयक्यू एअर व्हिज्युअलच्या अहवालानुसार, गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, भिवडी, दिल्ली आणि नोएडा या शहरांतील प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. या शहरांखालोखाल महाराष्ट्राचा विशेषत: मुंबईलगतच्या परिसराचा विचार करता ठाणे, भार्इंदर, ऐरोली, डोंबिवली, भिवंडी, विरार यासारख्या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. भारतासह पाकिस्तानातील प्रदूषणाचे प्रमाणही वाढत असून, बांगलादेशचाही यात समावेश आहे.

दक्षिण आशियातील दिल्ली हे राजधानीचे शहर सर्वाधिक प्रदूषित असून, राजधानीच्या शहरांत बांगलादेशची राजधानी ढाका या शहराचा समावेश आहे. आयक्यू एअर व्हिज्युअलकडील ताज्या आकडेवारीनुसार, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली येथील प्रदूषणाचा स्तर वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे यास शहरातील वाढती वाहने आणि वाढत्या बांधकामांसह कमी होणारे वृक्ष कारणीभूत आहेत.

शहर, देश, शनिवारची हवेची गुणवत्ता
शियांग         चीन           १७६
बिजिंग         चीन           १६५
मुंबई           भारत         १५७
चॉगिंग        चीन            १५४
वुहान          चीन           १५२
कोलकाता  भारत          १३८
हँगुजू          चीन            १२३
ढाका         बांगलादेश   ११८
हनाई         व्हिएतनाम   ११७
(पार्टीक्युलेट मॅटर, धूलिकणांची घनता २.५)

ठिकाण, शनिवारची हवेची गुणवत्ता
बोरीवली     २७३
अंधेरी         ३१४
बीकेसी       २९३
नवी मुंबई   ३५८
(पार्टीक्युलेट मॅटर, धूलिकणांची घनता २.५)

गुणवत्तेनुसार हवेचा दर्जा
०-१०० उत्तम
१०१-२०० सामान्य
२०१-३०० वाईट
३०१-४०० अत्यंत वाईट
४०१-५०० चिंताजनक

Web Title: The question of air pollution in cities like Mumbai, Thane is complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.