Join us

असुरक्षित अ‍ॅपमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 3:36 PM

झूम अ‍ॅपमुळे ई लर्निंगचा पालकांनी घेतला धसका ...!

 

मुंबई  : लॉकडाऊन कालावधीमध्ये संवाद साधण्यासाठी सध्या झूम एपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी ऍप सुरक्षित नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्यापासून याचा मोठा धसका पालकवर्गाने घेतला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन  किंवा ई लर्निंगचा स्वीकार केला आहे. विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांचा ई लर्निंगच्या क्लासेससाठी झूम  ऍपचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. मात्र हे  ऍप सुरक्षित नसल्याच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांना यातून होणाऱ्या लेक्चर्ससाठी बसून द्यावे कि नाही हा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. याचा धसका पालकांनी घेतला असून या ऐवजी शाळांनी विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी वेगळा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही पालक वर्गातून होत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणि राज्यात लॉकडाऊन कालावधी वाढविण्पुयात आला आहे  या काळात अनेकांकडून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी गुगलच्या झूम ऍपचा वापर होत आहे. दरम्यान अनेक शाळांनी ही ई लर्निंगचा पर्याय स्वीकारला असून दहावी ,बारावी चे महाविद्यालयाकडून असणारे वर्ग असूद्यात किंवा  कोचिंग क्लासेसकडून घेतले जाणारे वर्ग, तसेच सीबीएसई , आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे शाळातील नियमित वर्ग हे सारे झूम आणि सिस्को सारख्या ऍपच्या माध्यमातून होत आहेत. मात्र आता हे  ऍप सुरक्षित नसल्याच्या इशाऱ्याने आपल्या पाल्याची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची प्रतिक्रिया पालक वर्गातून उमटत आहे. यासंबंधी अनेक पालकांनी शाळा , शाळा प्रशासन आणि पालक संघटनेकडे ई लर्निंगसाठी वेगळा पर्याय शोधावा अथवा हे वर्ग बंद  करावेत अशा सूचना केल्या आहेत.दरम्यान इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनकडून यासाठी सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये पालकांना विविध प्रश्न विचारण्यात येत असून त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत.  शाळेमध्ये ऑनलाईन क्लासेससाठी कोणते  ऍप  वापरले जात आहे ? ते सुरक्षित आहे का ? झूम  ऍपद्वारे आपल्याला ऑनलाईन क्लास सुरु ठेवायचे आहेत का ? शाळांना शाळा सुरु झाल्यावर शनिवारची  रद्द करून ज्यादा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेता येणार नाही का ? असुरक्षित ऍप वापरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली तर जबाबदार कोण ? असे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.  राज्य सरकार , केंद्र सरकार,  बालहक्क आयोगाकडून यासंबंधित शाळा महाविद्यालयांना  मार्गदर्शक सूचना दिल्या जाव्यात ज्याने विद्यार्थ्यांची , माहिती तात्यांची सुरक्षितता अबाधित राखली जाईल आणि ई लार्निंग मध्येही अडथळा येणार नाही अशी प्रतिक्रिया जोगेश्वरी येथील पालक राजेश भालेकर यांनी दिली.

टॅग्स :सोशल मीडियाकोरोना वायरस बातम्याशिक्षणविद्यार्थी