वाढत्या वीज बिलांचा प्रश्न सुटणार, ई-मेलला २४ तासांच्या आत मिळणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:16 AM2018-12-02T05:16:50+5:302018-12-02T05:17:03+5:30

आॅगस्ट महिन्यासह सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत वाढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी करत वीज ग्राहकांनी ‘अदानी’च्या नावाने बोटे मोडली.

The question of rising electricity bills will be solved, e-mail will be answered within 24 hours | वाढत्या वीज बिलांचा प्रश्न सुटणार, ई-मेलला २४ तासांच्या आत मिळणार उत्तर

वाढत्या वीज बिलांचा प्रश्न सुटणार, ई-मेलला २४ तासांच्या आत मिळणार उत्तर

Next

मुंबई : आॅगस्ट महिन्यासह सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत वाढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी करत वीज ग्राहकांनी ‘अदानी’च्या नावाने बोटे मोडली. विशेषत: अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याने ग्राहकांच्या बाजूने राजकीय पक्षांनी आंदोलने छेडली. या सर्व प्रकारानंतर आता अदानीने वीज ग्राहकांच्या समस्या समजावून घेत त्या सोडविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी हेल्पलाइन, ई-मेल आणि शिबिरे भरविण्यात येत असून, वीज ग्राहकांच्या सर्व समस्या सोडविल्या जाणार आहेत.
बिलिंगसंबंधी प्रश्नांची दखल घेण्यासाठी १-१५ डिसेंबरदरम्यान कांदिवली, भार्इंदर, वांद्रे, चेंबूर, गोरेगाव, एमआयडीसी अंधेरी, अंधेरी पश्चिम आणि साकी नाका अशा आठ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी येथे दाखल होताना सोबत वीज बिल ठेवायचे आहे. वीज बिलांबाबत ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिसाद म्हणून दिवसाचे २४ तास आणि आठवडाभर अखंडपणे सुरू असलेली १९१२२ ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे.
याशिवाय ई-मेल आयडी कार्यान्वित करण्यात आला आहे. याद्वारे वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. २४ तासांच्या आत ई-मेलला उत्तर दिले जाणार आहे. शिबिरांमध्ये ग्राहकांचे बिलिंगसंबंधी प्रश्न समजून घेऊन, त्यांचे निराकरण केले जाईल.
>येथे होणार विशेष शिबिरांचे आयोजन
कांदिवली - शंकर लेनचे जंक्शन, एस.व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम).
भार्इंदर - पवन पुत्र बिल्डिंग, घोडदेव फाटक (रेल्वे क्रॉसिंगजवळ), काशी मीरा रोड, भार्इंदर.
वांद्रे - आरएनए कॉर्पोरेट पार्क, जुने कला मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे (पूर्व).
चेंबूर - सहकार सिनेमाजवळ, टिळकनगर रोड नंबर. ३, चेंबूर.
गोरेगाव - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, दिंडोशी, गोरेगाव (पूर्व).
अंधेरी (पूर्व) - प्लॉट क्रमांक ई-४, एमआयडीसी क्षेत्र, मरोळ, अंधेरी (पूर्व)
अंधेरी (पूर्व) - ए. के. रोड, पार्क डेव्हिसजवळ, साकी नाका, अंधेरी (पूर्व)
अंधेरी (पश्चिम) - उषा किरण इमारत, नाडको मार्केटजवळ, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम)

Web Title: The question of rising electricity bills will be solved, e-mail will be answered within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.