मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समाजातील ३१ हजार १६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीच्या प्रलंबित निधीला राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे १० कोटी ४१ लाख २८ हजारांची रक्कम लवकरच वितरित केली जाईल. गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार गेल्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९,८३९ जणांना शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. त्यापैकी २१,६१२ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि ८ हजार ७७४ जणांची दुसºया हप्त्याची रक्कम मिळून एकूण १० कोटी २१ लाख ५० हजार ३३१ रुपये थकले होते. कोरोनामुळे निधी वितरणास विलंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न अखेर मार्गीमुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समाजातील ३१ हजार १६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीच्या प्रलंबित निधीला राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे १० कोटी ४१ लाख २८ हजारांची रक्कम लवकरच वितरित केली जाईल. गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार गेल्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९,८३९ जणांना शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. त्यापैकी २१,६१२ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि ८ हजार ७७४ जणांची दुसºया हप्त्याची रक्कम मिळून एकूण १० कोटी २१ लाख ५० हजार ३३१ रुपये थकले होते. कोरोनामुळे निधी वितरणास विलंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.