मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासह पुनर्वसनासाठी स्थानिक रहिवासी, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका विभागीय स्तर, म्हाडा आणि एसआरए स्तरावर बैठका घेऊन योग्य समन्वयातून निर्णय होणे अपेक्षित असते. मात्र यंत्रणांच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारासह राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रक्रियेचा बट्ट्याबोळ होतो. परिणामी, धोका वाढल्याने इमारत दुर्घटनांमुळे बळींचा आकडा वाढतच जातो.मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक इमारतींची संख्या दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढते आहे. २०१६ साली धोकादायक इमारती सुमारे ७४० होत्या. ही संख्या आजघडीला सुमारे ७९१ पर्यंत पोहोचली आहे. कुर्ला येथे धोकादायक इमारतींची संख्या अधिक असून, हा आकडा सुमारे ११३ एवढा आहे. घाटकोपर, माटुंगा, दादर, सायन, अंधेरी येथे धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. अतिधोकायक किंवा धोकादायक इमारती रिकाम्या करण्यापासून, इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनापर्यंतची प्रक्रिया राबविताना यंत्रणांचा कस लागतो. किंवा या प्रक्रिया पूर्ण करताना यंत्रणांना रहिवाशांशी समन्वय साधता येत नाही. परिणामी, इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडविला जात नाही.उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण केवळ पावसाळापूर्व कालावधीत न करता, सतत चालू ठेवण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य अभियंत्यांना म्हाडाकडून देण्यात येतात. सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू असतानाच, अतिधोकादायक इमारतींचा आकडा वाढण्याची शक्यता असते. त्यानुसार, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असतात, असा दावा कायमच म्हाडासह तत्सम प्राधिकरणांकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र, कागदी कार्यवाहीच्या पुढे संबंधित प्राधिकरणे जात नाहीत.मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले असून, सर्वेक्षणांती एकूण९ इमारती म्हाडाकडून यापूर्वीच अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत.इमारत क्रमांक १४४, एम. जी. रोड, एक्स्प्लेनेड मेंशनइमारत क्रमांक २०८-२२०, काझी सय्यद स्ट्रीटइमारत क्रमांक ५५-५७, नागदेवी क्रॉस लेनइमारत क्रमांक ४४-४६, काझी स्ट्रीट/९०-९४-१०२, मशीद स्ट्रीटइमारत क्रमांक १०१-१११, बारा इमाम रोडइमारत क्रमांक १७४-१९०, १२५-१३३, के. एम. शर्मा मार्गइमारत क्रमांक ३०-३२, दुसरी सुतार गल्लीइमारत क्रमांक ३९, चौपाटी, सीफेसइमारत क्रमांक ४६-५०, लकी मेन्शन, क्लेअर रोडमुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अ, ब आणि क वर्गातील एकूण १९ हजार ६४२ उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्रचना म्हाडामार्फत करण्यात येते. सद्य:स्थितीमध्ये उपकरप्राप्त इमारतींपैकी काही इमारती कोसळल्याने, तर काही अत्यंत मोडकळीस आल्याने तोडल्यामुळे, काही इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास झाल्याने, काही इमारती उपकरातून वगळल्याने, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४ हजार ३७५ एवढी आहे.पाच वर्षांतील इमारत दुर्घटनाडिसेंबर २०१२ - लोअर परळ येथील कमला मिल्स, व्हिक्टोरिया हाउस या कार्यालयाचे जीएसडब्ल्यू इस्पात स्टीलचे दोन कर्मचारी मृत्युमुखी पडले़सप्टेंबर २०१२ - ताडदेव सोना इमारतीचा स्लॅब कोसळून ७८ वर्षीय वृद्ध ठाऱमे २०१२ - भायखळा येथील लक्ष्मी बिल्डिंगचा स्लॅब कोसळून एक कामगार ठाऱ१० जून २०१३ - माहीम दर्ग्याजवळ अल्ताफ मॅन्शनची एक बाजू कोसळून दहा जण ठार आणि सहा जण जखमी़ या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बेकायदा बदलाची तक्रार रहिवाशांनी पालिकेकडे केली होती़१२ जून २०१३ - बोरीवली येथील राजवैभव या पाच मजली इमारतीला तडे जाऊ लागले़ स्लॅब कोसळण्यास सुरुवात झाल्यामुळे रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली़ ६० कुटुंबे बेघर झाली.१७ जून २०१३ - माहीम रेल्वे स्थानकाजवळ रेल व्ह्यू या तीन मजली इमारतीची पाण्याची टाकी आणि जिन्याखालचा भाग कोसळला़ दुसºया मजल्यावरील कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आले़२२ जून २०१३ - दहिसर येथील पीयूष इमारत कोसळून सात जण ठार झाले होते़ ही इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली होती़ स्थानिक फेरीवाले आणि वॉचमनचे कुटुंब बळी ठरले़२७ सप्टेंबर २०१३ - डॉकयार्ड येथील पालिका वसाहत कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाला होता.२५ जुलै २०१७ - घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू. दुरुस्तीदरम्यान खांब तोडणारा शिवसेनेचा स्थानिक नेता सुनील शितपला जबाबदार धरले.
प्रश्न जैसे थे : धोकादायक इमारतींच्या संख्येत वर्षात सहा टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 2:03 AM