मुंबई : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाचे आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर किंवा वेंटिंग लिस्टवर नाव असल्यामुळे प्रवास रद्द केल्यानंतर त्या तिकिटाचा परतावा देण्यासाठी नवीन ‘ओटीपी’ आधारित सेवा सुरू केली आहे.
आयआरसीटीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सुविधा ज्या प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत एजंटांमार्फत ई-तिकीट आरक्षित केलेअसेल; त्यांनाच मिळू शकणार आहे. रेल्वे प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानंतर परतावा द्यावा लागतो, या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ही नवीन कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड तयार करून तो प्रवाशाच्या नोंदविलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. या पासवर्डच्या मदतीने प्रवाशांना रद्द तिकिटाचे पैसे त्वरित मिळू शकणार आहेत.
रद्द रेल्वे तिकिटाचे पैसे त्वरित मिळावेत, यासाठी प्रवाशांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असून; यात आयआरसीटीसीच्याअधिकृत एजंटला ई-तिकीट काढतानाच योग्य तो मोबाइल क्रमांक देणे गरजेचे आहे. त्या एजंटाने प्रवाशाचा मोबाइल नोंदविला आहेकी नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांकडूनच ई-तिकीट काढले पाहिजे. ज्या प्रवाशांनीआयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांकडूनच ई-तिकीट काढले आहे, त्यांनाच रद्द तिकिटांचा परतावा ओटीपी आधारित सेवेतून मिळूशकणार आहे, याचा समावेश आहे