रमजान महिन्यात मराठी भाषेत कुरआनची प्रवचने...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:39 PM2020-04-25T15:39:20+5:302020-04-25T15:40:03+5:30
लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या भाविकांना मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत सुरु झालेल्या रमजानच्या महिन्यात अनेक भाविक मशिदींमध्ये जाऊन नमाजात सहभागी न होता घरीच नमाज पडणार आहेत. मात्र नमाजमध्ये प्रत्यक्ष जाऊन सहभागी होता येणार नसले तरी या भाविकाना या त्यांच्या पवित्र महिन्यात विशेष ऑनलाईन प्रवचनांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे या मार्गदर्शनाचा एक भाग मराठीत ही प्रसारित केला जाणार आहे.
रमजानच्याया महिन्सात जमात-ए-इस्लामी हिंद आणि विद्यार्थी संघटना स्टूडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ)कडून दररोज तीन प्रवचने - एक हिंदीमध्ये, दुसरे मराठीत आणि तिसरे महिलांसाठी खास प्रवचन ऑनलाईन प्रसारित केले जाणार आहे. या प्रवचनांद्वारे इस्लामिक विद्वान व तज्ञ हे कुरआनमध्ये काय शिकवण दिली आहे याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय ज्यांना भाविकांना या महिन्यात काही नियमित कामे व कृतीपासून वंचित रहावे लागणार आहे तय्साठी नेमके काय करावे यावरही मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी एसआयओ १ मे पासून राज्यातील मराठी भाषिक लोकांसाठी कुरआनच्या शिकवणी समजावन्यासाठी ऑनलाइन 'कुरआन सार' नावाची विशेष मालिका सुरू करणार आहे. रमजान महिन्याचे महत्त्व कुरणामुळेच आहे, या महिन्यात दररोज रात्री 'तरावीह' नावाची विशेष प्रार्थना केली जाते, जिथे दररोज कुरआनच्या तीस भागांमधून एका भागाचे वाचन केले जाते. सामान्यत: अरबी भाषेत पाठ होत असताना अनेक मशिदींमध्ये स्थानिक भाषांमध्ये याचे भाषांतर केले जाते. याच पार्श्वभूमीवर याचे मराठीतही भाषांतर केले जाते अशी माहिती मराठी प्रवचन देणारे इस्लामिक त्तज्ज्ञ नौशाद उस्मान यांनी दिली.
या सोबतच कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून उपवासाचा महीना पाळताना सर्व आवश्यक नियम पाळून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जमातने केले आहे. आपल्या सगळ्या प्रार्थनांचे पठन आपण योग्य शारीरिक अंतर राखून घरातच करायला हवे असे आवाहन जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष रिझवान-उर-रहमान खान यांनी केले आहे.