Join us

आर. ए. राजीव यांना ईडीचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:07 AM

आर. ए. राजीव यांना ईडीचे समन्सटॉप सिक्युरिटी घोटाळा; आज हाेणार चाैकशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या टॉप ...

आर. ए. राजीव यांना ईडीचे समन्स

टॉप सिक्युरिटी घोटाळा; आज हाेणार चाैकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्या टॉप सिक्युरिटी कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा लागला आहे त्याच घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त आर. ए. राजीव यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठविले आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता याप्रकरणी राजीव यांच्याकडे चौकशी केली जाईल.

२०१४ ते २०१४ दरम्यान टॉप सिक्युरिटी आणि एमएमआरडीएमध्ये जो व्यवहार झाला, त्याच्या तपासणीसाठी ईडीने समन्स बजावले आहे. या काळात एमएमआरडीएचे आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान काम करीत होते. आता ते निवृत्त झाले आहेत. सध्या एमएमआरडीएचा पदभार आर. ए. राजीव यांच्याकडे आहे. परिणामी राजीव यांना बोलाविण्यात आले आहे. राजीव हे ईडीला सहकार्य करतील, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. आता राजीव यांच्या चौकशीनंतर नेमके काय समोर येणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

२०१४ ते २०१७ मध्ये टॉप सिक्युरिटीने एमएमआरडीएला आपली सुरक्षा पुरविली होती. तेव्हा १०० सिक्युरिटीचे पैसे घेतले गेले. मात्र, प्रत्यक्षात कमी संख्येने सिक्युरिटी गॉर्ड पुरविल्याचा आरोप आहे. हा आर्थिक व्यवहार अनेक वर्षे चालत होता. या सर्व प्रकरणाची चौकशी ईडी करीत आहे. मात्र मदान निवृत्त झाल्यानंतर २०१४ ते २०१७ दरम्यान झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे चौकशीदरम्यान तपासली जातील. राजीव जाऊ शकले नाहीत, तर प्रतिनिधी म्हणून प्राधिकरणाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील. मात्र, राजीव स्वत: चौकशीला हजर राहणार आहेत.

...........................