मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीचा विषय चर्चेत आला आहे. गॉडफादर नसलेल्या कलाकारांना मिळणारी वागणूक आणि प्रस्थापितांना मिळणारी विशेष वर्तणूक याबद्दल सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधल्या अनेकांनी यावर भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संगीताचं नाणं अतिशय खणखणीत वाजवणाऱ्या संगीतकार ए. आर. रेहमान (A. R. Rahman) यांनीदेखील बॉलिवूडमधील गटबाजीवर व्यक्त होत त्यांना येत असलेल्या अडचणी बोलून दाखवल्या. यावर कालपासून अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा मानस रेहमान यांनी बोलून दाखवला आहे.बॉलिवूडमधील एक टोळी माझं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला सध्या चांगले चित्रपट मिळत नाहीत, असा दावा रेहमान यांनी केला. त्यानंतर गेल्या २४ तासांत रेहमान यांच्या विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र हा वाद फार वाढू न देण्याचा प्रयत्न रेहमान करत असल्याचं त्यांच्या आताच्या ट्विटमधून दिसत आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांचं एक ट्विट रिट्विट करताना रेहमान यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
'बॉलिवूड गँग'वरून वाद वाढू लागताच रेहमान यांचं ट्विट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 9:44 PM