मुंबई - बहुप्रतीक्षित व बहुचर्चित 'राझी' सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. ''तयार हो बेटा, हिंदुस्थान के साथ हमारे हालत काफी सख्त होने वाले है...'', ''वो आसमान देख रहे होंगे और हम उनके पाँव तलेसे जमीन खीच लेंगे...'', भारत-पाकिस्तानामधील तणावपूर्वक परिस्थितीसंदर्भातील संवादांनी राझी सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात करण्यात आली आहे. अल्पावधीतच अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रचंड यश कमावलेली अभिनेत्री 'आलिया भट्ट' सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.
सिनेमामध्ये आलियानं 'सेहमत' या भारतीय तरुणीची व्यक्तीरेखा साकारली आहे. ''मैं चाहता हूँ की तुम हिंदुस्थान की आँख और कान बनके पाकिस्तान मे रहो...'' या आदेशाचं पालन करत सेहमत पाकिस्तानात जाऊन देशासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याचे कामगिरी बजावत असते. एका गुप्तहेर महिलेची कथा सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमातून आलिया भट्ट पुन्हा एक जबरदस्त अभिनय करताना सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे. 11 मे रोजी राझी सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
भारत-पाक तणावापासून ट्रेलरची सुरुवात ट्रेलरची सुरुवातच भारत-पाकिस्तानमधील तणावानं होते. भारताची गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात राहता यावे यासाठी सेहमतचे वडील तिचा विवाह पाकिस्तानातील एका अधिका-यासोबत करतात. विकी कौशलनं आलियाच्या पतीची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये अनेक भावनिक दृश्यंदेखील पाहायला मिळत आहेत. मेघना गुलजार यांचा राझी सिनेमा एका शूर तरुणीच्या आयुष्यावर आधारित आहे.
VIDEO :