रवींद्र कुलकर्णींची मुंबई तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 07:21 PM2023-06-06T19:21:50+5:302023-06-06T19:22:09+5:30

डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Rabindra Kulkarni's Mumbai and Dr. Appointment of Suresh Gosavi as Vice-Chancellor of Pune University |  रवींद्र कुलकर्णींची मुंबई तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती 

 रवींद्र कुलकर्णींची मुंबई तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती 

googlenewsNext

डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी व डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 

राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
 

Web Title: Rabindra Kulkarni's Mumbai and Dr. Appointment of Suresh Gosavi as Vice-Chancellor of Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.