भावाच्या उपचारासाठी रेसिंगमध्ये

By admin | Published: January 2, 2017 06:05 AM2017-01-02T06:05:12+5:302017-01-02T06:05:12+5:30

गो...झूम... लहानपणापासूनच स्पोर्ट्स बाईक, रेसिंग कारचे आकर्षण, आवड आणि जडलेल्या छंदामुळे रेसिंगच्या नशिल्या दुनियेत तरूणाई गुरफटत चालली आहे

In racing for brother's remedies | भावाच्या उपचारासाठी रेसिंगमध्ये

भावाच्या उपचारासाठी रेसिंगमध्ये

Next

मनीषा म्हात्रे, मुंबई
गो...झूम... लहानपणापासूनच स्पोर्ट्स बाईक, रेसिंग कारचे आकर्षण, आवड आणि जडलेल्या छंदामुळे रेसिंगच्या नशिल्या दुनियेत तरूणाई गुरफटत चालली आहे. ‘जीवाशी’ लागणाऱ्या या पैजेत अडकत चाललेल्या तरूणाईला एकतर आपला जीव गमवावा लागतो. नाही तर, ते कायमचे जायबंदी होता. पण, यांची काळजी अथवा चिंता कोणालाच नसल्याचे दिसून येते. कारण, या प्रकरणांची नोंद साधी अपघाती घटनेची नोंद म्हणून पोलीस ठाण्यात होते. अशा या कायमच्या जायबंदी झालेल्या आणि जीव गमावलेल्या रेसिंग वेड्या तरुणांची ही कहाणी.
रेसिंगच्या नशेत अपघात होऊन अंथरुणाला खिळलेल्या भावाचा जीव वाचवला. आणि पुन्हा भावाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरच्या रेसिंगमध्ये भाग घेतला. जायबंदी झालेला भाऊ डोळ्यासमोर येत असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता तो या रेसिंगमध्ये उतरला. नवखा असला तरी तो जिंकला, पैसेही कमवले. भावाचे प्राण वाचवले पण भाऊ पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाही
हे वास्तव आहे. रेसिंगमुळे
जायबंदी झालेल्या काही तरूण-तरूणींचे हृदयद्रावक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केले. आम्ही सुद्धा घटनास्थळी जाऊन अपघात का झाला? याची कारणे शोधून त्याच्यावर उपाययोजना करतो, असे एका रायडरने सांगितले.


अक्षय आजही अंथरूणाला खिळलेलाच
मोहम्मद अली रोडवर राहणारा २० वर्षीय अक्षय (नावात बदल) आई वडील आणि मोठ्या भावासोबत राहातो. शाळा, कॉलेजपासूनच वेगाबरोबर धावण्याची नशा त्याच्या डोक्यावर स्वार होती. ही नशा रस्त्यावरच्या बाईक रेसिंगमध्ये गुंतली. सुरुवातीचा काही काळात तो हिरो ठरला. मात्र वरळी-वांद्रे सी लिंकवर लागलेल्या रेसिंगमध्ये अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयच्या अपघाताची माहिती मिळताच भाऊ रमेशने (नावात बदल) धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारासाठी लाखो रुपये लागणार असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. घरात होते नव्हते ते विकले. पण पैसे कमीच पडत होते. अशातच मुंबई पुणे एक्सप्रेसवर रेसिंग होणार असल्याची माहिती रमेशला मिळाली. भावाच्या उपचारासाठी त्याने या जीवघेण्या रेसिंगमध्ये भाग घेतला. आणि तो जिंकलाही. मात्र त्याचे हे पैसे अक्षयच्या उपचारांच्या कामी पडले नाहीत. अक्षय आजही अंथरूणाला खिळलेलाच आहे.
या घटनेला दोन वर्षे उलटली मात्र अद्याप त्याच्या या अपघाताच्या आठवणीतून हे कुटुंब सावरलेले नाही. असे अनेकजण आजही या मृत्यूच्या वेगाला कवेत घेत आहेत. मात्र त्याच्या मागे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होत आहेत, याचे भान त्यांना नाही आहे. आयुष्य उद्धवस्त
धनाढ्य बापाचा एकुलता एक मुलगा. उच्चभ्रू इमारतीत राहयाचा. नवीन महागड्या गाड्यांची क्रेझ होती. रेसिंगमध्ये जखमी झाल्यामुळे चेहरा विद्रूप झाला. प्लास्टिक सर्जरी झाली. आरशामध्ये स्वत: ला पाहू शकत नाही. या विचाराने त्याच्या डोक्यावरही परिणाम झाला. वयाच्या २५ व्या वर्षी तो घराबाहेर पडत नाही. माझगावच्या तरुणाची ही कहाणी आहे. जीवाची पर्वा नाही
रेसिंगच्या जाळ्यात अडकल्यावर मृत्यू ९० टक्के ठरलेलाच असतो. मृत्यूच्या दाढेतून जे १० टक्के वाचतात एकतर ते अंथरुणाला खिळतात अथवा अपंग होतात. स्वत:च्या जीवाची पर्वा करतच नाहीत. कारण, तेवढा विचार करण्याचा वेळही नसतोच. यातच मागे बसणाऱ्याची बातच येत नाही, पुढे पुढचा कोणी रायडर जीव गमावेल याचीही मनात भीती नसते.

बळी ठरले : गेल्या दोन आठवड्यात याच रेसिंगच्या नादात चार जणांनी जीव गमावला. मात्र याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
...आणि लग्न मोडले
कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. अशात सोनमला (नावात बदल) नशा करण्याची सवय लागली. नशेची हौस भागविण्यासाठी ती रेसिंग मधल्या कपल स्पर्धेत भाग घ्यायला लागली. या रेसिंगची नशा तिला अधिकच चढली. रेसिंगच्या व्यसनात सोनम हरवून गेली आहे. तिचा साखरपुडा झाला. मात्र जेव्हा ही बाब तिच्या सासरच्या मंडळीना समजली तेव्हा त्यांनी लग्न मोडल्याचे सोनमच्या मैत्रिणीकडून सांगण्यात आले. मिळाले अवघे दहा हजार
मीही हळूहळू रेसिंगच्या जाळ्यात कधी ओढलो गेलो हे कळलेच नाही. ९०, १८० डिग्रीच्या थरारात खेळलो. अशात पैशाच्या ओढीने २०१३ मध्ये लागलेल्या रेसिंगमध्ये भाग घेतला. रेस जिंकली. जखमीही झालो. त्यात १० लाख जिंकले असताना हातात अवघे १० हजार रुपये दिले. मालकाकडे जाब विचारला तर हरला असतास तर नुकसान माझेच झाले असते असे मालकाने सांगितले. मिळालेले पैसेही उपचारार्थ खर्च झाले. तेव्हापासून ठरविले आता नाही. आता स्वत:चा व्यवसाय आहे. त्यातून कुटुंब आणि कामात मी सुखी आहे. - सुमेर खान, रायडर, नागपाडा

Web Title: In racing for brother's remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.