जर्मनीतील रेसमध्ये पनवेलमधील रेसिंग कारचा समावेश

By admin | Published: July 20, 2014 11:05 PM2014-07-20T23:05:34+5:302014-07-20T23:05:34+5:30

नवीन पनवेल येथील पिल्लाई कॉलेजमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला रेसिंग कार तयार केली आहे.

Racing car in Panvel in Germany race | जर्मनीतील रेसमध्ये पनवेलमधील रेसिंग कारचा समावेश

जर्मनीतील रेसमध्ये पनवेलमधील रेसिंग कारचा समावेश

Next

प्रशांत शेडगे, पनवेल
नवीन पनवेल येथील पिल्लाई कॉलेजमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला रेसिंग कार तयार केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार जर्मनी येथे होणाऱ्या कार रेसिंगच्या स्पर्धेत धावणार असल्याची माहिती संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी निवेदिता श्रेयन्स यांनी दिली
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत कला आणि गुणांना वाव देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी पिल्लाई कॉलेजमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला अधिक चालना देण्यासाठी वेगवेगळे महोत्सवही भरविण्यात येतात. विशेषत: या महाविद्यालयातून बाहेर पडणारे इंजिनिअर बाहेरच्या स्पर्धेत अधिक आत्मविश्वासाने सामोरे जावेत याकरिता कॉलेज विविध स्पर्धेत सहभाग नोंदवते. देश-विदेशात होणाऱ्या या स्पर्धेत पिल्लाई सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. सध्या रेसिंगचा जमाना असून फॉर्म्युला कारची क्रेझ आहे.अनेक देशात गाडीची रेसिंग अतिशय लोकप्रिय असून सर्वसाधारणपणे युरोपीय देशात या स्पर्धा घेण्यात येतात.सोसायटी आॅफ अ‍ॅटोमेटीव्ह या संस्थेने २९ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत रेसिंग कार स्पर्धा जर्मनीमध्ये आयोजित केली आहे. जगभरातील एकूण ७२ संघ यामध्ये सहभागी होणार असून पिल्लाई कॉलेजचा चमू भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे श्रेयन्स यांनी सांगितले. त्याकरिता कॉलेजमधील मेकॅनिकल, आॅटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या २२ विद्यार्थ्यांच्या चमूने एच. आर.टी २०१ (हायपर रेसिंग टीम) हे रॅसिंग कारचे मॉडेल तयार केले आहे. ५७५ सीसीची ही कार असून अडीच टन वजन आहे. दीपक पद्नामन या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली सर्व टीम सहा महिने ही गाडी तयार करण्यासाठी परिश्रम घेत होते. याकरिता सुमारे दहा लाख रूपये खर्च आला असल्याचे पद्नामन याने सांगितले.शनिवारी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जगाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झालेली ही रेसिंग कार पनवेलकरांसमोर अवतरली. या कारची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्यांनी एच.आर.टी २०१ची इत्यंभुत माहिती उपस्थितांना दिली. त्याचबरोबर तिचे वैशिष्ट्य,तयार करण्यासाठी आलेल्या अडचणी याकरिता पिल्लाई व्यवस्थापन, प्रायोजक कंपनी त्याचबरोबर प्राध्यापकांकडून कशा प्रकारे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले याबाबतचा अनुभव टीमच्या सदस्यांनी कथन केला. आता फक्त प्रत्यक्ष अनुभवाची उत्सुकता आहे.

Web Title: Racing car in Panvel in Germany race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.