टाटा रूग्णालयातील कर्मचारीच चालवत होते रॅकेट; २४ जणांविरोधात गुन्हा, ११ जणांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: July 18, 2023 11:39 PM2023-07-18T23:39:08+5:302023-07-18T23:39:52+5:30
कमिशनसाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांना खासगी प्रयोगशाळेचा मार्ग...
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबईः परेल येथील टाटा रुग्णालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यासह कर्मचारीच कमिशन साठी रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाडा पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यासाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. याप्रकरणी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २४ जणांविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवत, ११ जणांना बेड्या ठोकल्या आहे. त्यात खासगी प्रयोगशाळेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै ते आतापर्यंत रुग्णालयाचे सहाय्यक प्रशासकिय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई, आया व सफाई कर्मचारी या पदावर काम करणारे कर्मचारी यांनी कोणताही कायदेशीर अधिकार नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता इन्फीनिटी सेस व्यवस्थापक संजय सोनावणे व मालक तसेच व इतर डाम्नोसिस सेंटर चालविणाऱ्या चालकांशी संगनमत करून हे रॅकेट चालवत होते. खासगी प्रयोगशाळेचा व्यवस्थापक संजय सोनावणे याला काही दिवसांपूर्वी टाटा रुग्णलातील सुरक्षा रक्षकांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे विविध पाकिटे सापडले. त्यात रोख रक्कम होती. या पाकिटांवर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची नावे लिहिलेली असल्याचे दिसून येताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. जवळपास एक ते दीड लाखांची रोकड या पाकिटात होती. टाटा रुग्णालयात विविध चाचण्यासाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आरोपी कर्मचारी गांधी रुग्णालयाजवळील एका खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करण्यास सांगत होते. त्या रुग्णांच्या बदल्यात प्रयोगशाळेतून कमिशन मिळत होते.
अखेर, टाटा रुग्णालयाचे सुरक्षा अधिकारी अनिल शिवाजी भोसले (५६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ४०९, ४०६, ४२०, १२०(ब) भादवि अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी खासगी प्रयोगशाळेच्या व्यवस्थापकासह ११ जणांना अटक केली.
काय करायचे?
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्या या रुग्णालयात तात्काळ उपलब्ध असतानाही केवळ स्वतः चे आर्थिक फायदयाकरीता कमिशनपोटी त्यांना खाजगी डायग्नोस्टिक सेंटर मध्ये चाचणी करण्यास लावून गरीब कॅन्सरग्रस्त लोकांची तसेच शासनाची देखील लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक करत होते.
यांच्या विरुद्ध गुन्हा
संदिप हरिश्चंद्र गावकर, दिनेश रामचंद्र मोहिते, महेश मंगल सोलकी,फिरोज इक्बाल खान , जितेंद्र भरवाल, दिनेश रामफेर कलवार, राहुल सुशिल जाधव, आनंद रवि गंगास्वामी, सदानद नरसिम्हा सपालिगा, रवि गोहन परदेशी, राहुल वसांत महयावशी, नारायण रूपसिंग चौधरी, विकास श्रीपत गरे, राजेश प्रकाश बारीया, राकेश सज्जन परदेशी, सूर्यकांत आबाजी थोरात, आतिप अशोक सोनावणे, अश्विनी अनिल कासले, साकिर आशिक सय्यद, सुनिल व चाळके, नरेश व इन्फीनिटी डायग्नोसिस सेंटरला व्यवस्थापक संजय सोनावणे व मालक व इतर डाग्नोसिस सेंटर याच्याविरूद्ध गुन्हा नोंद आहे.
कुणाला अटक?
विकास श्रीपत गमरे,(२१), नारायण रूपसिंह चौधरी ४७, संजय प्रकाश सोनावणे ४२, वर्षे, राकेश सज्जन परदेशी, वय ४९ वर्षे, राजेश प्रकाश वारीया, वय ४० वर्षे, संदिप हरिश्चंद्र गावकर, वय ३५ वर्षे, रवी मोहन परदेशी वय ५४ वर्षे, राहुल वसत मायावंशी वय ३६ वर्षे, जितेंद्र रतन भरणवाल, वय ४५ वर्षे, सकीर आशिक सय्यद, वय ४० वर्षे, दिनेश रामफेर कलवार, वय ४२ वर्षे यांना अटक केली आहे. ११ आरोपींना २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.