Join us

मनसेचा ‘पीव्हीआर’मध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:21 AM

बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास विरोध करणाऱ्या चित्रपटगृहांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा उघडला आहे.

मुंबई : बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास विरोध करणाऱ्या चित्रपटगृहांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा उघडला आहे. रविवारी फिनिक्स मॉलमधील पीव्हीआर या मल्टिप्लेक्सविरोधात मनसेने ोरदार आंदोलन केले. खाद्यपदार्थांचे दर कमी करावेत, नियमानुसार बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत पीव्हीआर प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे बंदोबस्तावरील पोलिसांनी चित्रपटगृहांच्या सोयीची भूमिका घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्याशीही बाचाबाची केली.चित्रपटगृहांमध्ये १ आॅगस्टपासून बाहेरील खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी वरळी, प्रभादेवी भागातील कार्यकर्ते रविवारी लोअर परळच्या पीव्हीआर थिएटरवर धडकले. मनसेचे सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते तिकीट काढून चित्रपट पाहायला गेले. मात्र, या कार्यकर्त्यांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणल्याने त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. सरकारचा लेखी आदेश पोहोचला नसल्याची भूमिका पीव्हीआरने घेतली. पीव्हीआरने बाहेरील खाद्यपदार्थ आत नेण्यास परवानगी द्यावी अन्यथा त्यांच्या स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांनाही मनाई करावी, अशी मागणी मनसेचे स्थानिक नेते संतोष धुरी यांनी केली.