Join us

पाणीटंचाईवरून उल्हासनगरात राडा

By admin | Published: August 21, 2014 1:20 AM

ऐन पावसाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने बुधवारच्या महासभेत पाणीप्रश्न पेटला.

सदानंद नाईक - उल्हासनगर
ऐन पावसाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने बुधवारच्या महासभेत पाणीप्रश्न पेटला.  महासभा सुरू होताच बहुतांश नगरसेवकांनी पाणीटंचाईला खुच्र्या व पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेकी करून अभूतपूर्व गोंधळ घातला. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी चपलांचा हार स्वत:च्या गळ्यात घालून निषेध केला आहे. 
उल्हासनगर महापालिकेला गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका दरमहा बिल अदा करीत नसल्याचा ठपका एमआयडीसीने ठेवत पाणीकपात केल्याची प्रतिक्रिया पाणीपुरवठा विभागाचे कलई सेल्वन यांनी दिली.  
महासभा सुरू होताच काँग्रेस पक्षाच्या जया साधवानी, राष्ट्रवादी पक्षाचे सतरामदास जेसवानी, सेनेचे रमेश चव्हाण, प्रधान पाटील, सुरेश जाधव, सुभाष मनसुलकर, अपक्ष नगरसेवक सुनील सुर्वे, राजेश वानखेडे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न लावून धरला. आयुक्त महासभेला हजर राहत नाहीत  तोर्पयत महासभा स्थगित करण्याची मागणी या नगरसेवकांनी केली. सेनेचे स्वीकृत नगरसेवक बी. बी. मोरे यांनी पालिका अधिका:यांना धारेवर धरीत ठिय्या आंदोलन केले. यात इतर नगरसेवकही घोषणाबाजी करीत सहभागी झाले. काही नगरसेवकांनी तर खुच्र्या व पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेक केली. दरम्यान, नगरसेवक सतरामदास जेसवानी व अनू मनवानी यांनी अतिरिक्त आयुक्तांना चपलांचा हार देण्यासाठी धाव घेतली. मात्र सुभाष मनसुलकर यांनी जेसवानी यांना अडविले. यामुळे संतप्त झालेल्या जेसवानी यांनी नंतर स्वत:च्या गळ्यात चपलांचा हार घालून पालिका  आयुक्तांसह अधिका:यांचा निषेध केला. पाण्यावरून एमआयडीसीने कोंडी केल्याने पालिका प्रशासन हतबल झाले आहे. स्वत:चे पाणीस्त्रोत व योजना नसल्याने पाण्यासाठी महापालिकेला एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीने पाणी बंद केल्यास शहरात हाहाकार माजण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. 
 
च्एमआयडीसीने पालिकेवर 31क् कोटींची थकबाकी दाखविली असून, पाण्याचा दर 8 वरून 14 रुपये केला आहे. तसेच 12क् ऐवजी 17क् एमएलडीचे पाणी बिल पाठवित असून पालिकेला अडीच कोटी ऐवजी 7 कोटींचे बिल दरमहा एमआयडीसी पाठवित आहे.