Join us

वाझेंवर वरदहस्त असणारे ‘एनआयए’च्या रडारवर! गुन्ह्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:18 AM

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरापासून ५०० मीटरवर  आढळलेल्या स्फोटक कार प्रकरणाचा तपास वाझेंकडे सोपविला होता. सुमारे ८ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर एसीपी नितीन  अलकनुरे यांना नेमण्यात आले. तरीही सर्व सुत्रे वाझेच हाताळत होते.

जमीर काझी -

मुंबई : स्फोटक कार प्रकरणी एनआयएने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांना अटक केली असली, तरी त्यांना काही  वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. हे कृत्य करण्यामागील नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे त्याचा छडा लावण्यासाठी सचिन वाझेंकडे कसून  चौकशी करण्यासह त्यांचे  मोबाइल सीडीआर तपासण्यात येतील, असे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले. (On the radar of ‘NIA’ who has the upper hand on Wazen! The motive behind the crime is still unclear)

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरापासून ५०० मीटरवर  आढळलेल्या स्फोटक कार प्रकरणाचा तपास वाझेंकडे सोपविला होता. सुमारे ८ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर एसीपी नितीन  अलकनुरे यांना नेमण्यात आले. तरीही सर्व सुत्रे वाझेच हाताळत होते. ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत  मृतदेह आढळल्यानंतर तपास एटीएसकडे वर्ग झाला. हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वाझेंकडे चौकशीचा ससेमिरा लावला.  जबाबातील विसंगती, काही प्रश्नांची असमाधानकारक उत्तरे दिल्याने वाझेंवर कारवाईच्या दृष्टीने एटीएसने अहवाल बनवला. त्याला अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळण्यापूर्वीच एनआयएने त्यांना चौकशीअंती अटक केले. अंबानींच्या घराजवळ कार  नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास  सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे  इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त  असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी त्यांच्या मोबाइलचे सीडीआर तपासले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेंचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे एनआयए तपासातून आणखी कोणत्या धक्कादायक बाबी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हत्येचाही गुन्हा दाखल करणारसचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे  लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले.

गुन्ह्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापरसचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते. 

टॅग्स :सचिन वाझेपोलिसराष्ट्रीय तपास यंत्रणागुन्हेगारी