रेल्वे स्थानकावर अवयवदानाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:46 AM2017-07-31T00:46:23+5:302017-07-31T00:46:23+5:30

लोकांच्या मनात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१च्या माध्यमातून जनजागृती करून शंका आणि गैरसमज दूर केले जातील.

raelavae-sathaanakaavara-avayavadaanaacai-janajaagartai | रेल्वे स्थानकावर अवयवदानाची जनजागृती

रेल्वे स्थानकावर अवयवदानाची जनजागृती

Next

मुंबई : लोकांच्या मनात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१च्या माध्यमातून जनजागृती करून शंका आणि गैरसमज दूर केले जातील. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१मध्ये ९१ क्लब या मोहिमेशी जोडले गेले आहेत. यंदा गणेशोत्सव मंडळांसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर अवयवदान जनजागृती केली जाणार आहे. १०९ गणेशोत्सव मंडळांत अवयवदान मोहीम राबविली जाणार आहे. अवयवदान मोहीम सर्व लोकांपर्यंत पोहोचावी, याकडे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चा कल राहणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल शर्मा यांनी दिली.
मालाड पश्चिमेकडील एस. व्ही. रोड येथील एल. एम. पटेल आय हॉस्पिटल येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे अवयवदान मोहीम कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अवयवदान केलेल्या दात्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे जिल्हा प्रशासक प्रफुल्ल शर्मा, शशी शर्मा, मुंबई पश्चिम विभागाचे जनसंपर्क प्रमुख विकास उपाध्याय, संयोजक मनिष ग्यानी, रश्मी दास, अनिल कन्हैया, हरमिंदर सिंह, राजेश मोदी आणि अशोक अजमेरा उपस्थित होते.
१ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ क्लबची अवयवदान मोहीम सुरु राहील. मोहीम ५ वर्षे अविरतपणे सुरू राहणार आहे. रोटरीचे जनजागृती कार्यक्रम महिन्याभरात एक ते दोन वेळा होतील. दरम्यान, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ क्लबमार्फत रेल्वे स्थानकावर व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी वॉश इन स्कूल, शाळेमध्ये वाचनालय, शौचालय बनविण्याचे काम सुरू आहे.

Web Title: raelavae-sathaanakaavara-avayavadaanaacai-janajaagartai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.