Join us

Rafale Deal Controversy: तारिक अन्वर यांचं वागणं बेजबाबदार, शरद पवारांशी साधं बोललेही नाहीतः प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 3:08 PM

तारिक अन्वर यांनी पवारांचं विधान चुकीच्या पद्धतीनं घेऊन राजीनामा दिला आहे.

मुंबई- तारिक अन्वर यांनी पवारांचं विधान चुकीच्या पद्धतीनं घेऊन राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका बेजबाबदारपणाची आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, असा टोलाही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.प्रफुल्ल पटेल म्हणाले, तारिक अन्वर यांनी पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एकदा शरद पवारांना फोन करून विचारायला हवं होतं. आम्हाला याची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी हे पाऊल उचललं आहे. तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकसभेच्या खासदारकीचा प्रश्न अध्यक्षांच्या अखत्यारित येतो. राजीनामा पवारांकडे सोपवला असता विचार केला असता, असंही राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहे.तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. बिहारमधल्या कटिहारमधून राष्ट्रवादीतर्फे तारिक अन्वर हे लोकसभेत खासदार आहेत. पवारांच्या भूमिकेवर ते काहीसे नाराज होते. गेल्या काही दिवसांपूर्वी तारिक अन्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल करारावरून टीका केली होती. राफेल करारातील घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपांवर मोदींनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. या विधानानं मला अतीव दुःख झाल्यानं मी हे पाऊल उचललं आहे, असं तारिक अन्वर यांनी  सांगितलं आहे. 

टॅग्स :राफेल डीलकाँग्रेसशरद पवार