Rafale Deal : राफेलच्या विमानाची किंमत 712 कोटींवरून 1600 कोटी कशी झाली?, प्रकाश आंबेडकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:33 PM2018-09-24T14:33:50+5:302018-09-24T14:41:59+5:30
Rafale Deal : राफेल डीलवरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई - राफेल डीलवरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनीही राफेल डीलवरुन पंतप्रधान मोदींसमोर काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या काळात एका राफेल विमानाची किंमत 712 कोटी रुपये होती, भाजपाने ती 1600 कोटी रुपये केली, असा थेट आरोप आंबेडकर यांनी केला आहे. अचानक एवढी किंमत कशी वाढली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डीलवरुन हल्लाबोल चढवला.
(पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल)
प्रकाश आंबेडकर यांचे पत्रकार परिषदेतील मुद्दे
- हे विमान कायम रेडी टू यूज ठेवण्याची किंमत 1 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे अशी माझी माहिती आहे
- उत्पादन फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स करणार
- सरकारी कंपनी एचएएलला काढून रिलायन्सला हे काम दिले
- सरकारने राफेलची रेडी टू यूज किंमत किती असेल हे सांगायला हवे
(Rafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत')
- एचएएलकडे काम दिले असते तर ती किंमत किती असती आणि रिलायन्सला काम दिल्याने किंमत किती आहे हे सरकारने स्पष्ट करावे
- दरवर्षी विमान घेतल्यावर देखभालीसाठी रिलायन्सला 1 लाख कोटी द्यावे लागतील
-रिलायन्स ही विमान रेडी तू युज अशी ठेवतील याची गॅरंटी कोण देणार?
- हे डील डिफेन्सचा विरोधात आहे