मुंबई: फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज (29 जुलै) भारताला मिळणार आहेत. सुमारे 7000 किमी प्रवास करुन राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचतील. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे राफेल लढाऊ विमानं ताफ्यात सामील होण्यानं भारतीस हवाई दलाची ताकद वाढणार आहे. मात्र राफेल विमान ताफ्यात सामील झाल्यानं हवाई दलाची ताकद वाढेल. पण राफेल गेमचेंजर ठरणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले की, भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितले. तसेच भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राफेल विमानांच्या लँडिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर आहे. अंबालाला लागून असलेल्या ४ गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना एकत्र येण्या मनाई केली गेली आहे. विमानाच्या लँडिंगच्या वेळी छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी आहे, अशी माहिती अंबाला डीएसपी (वाहतूक) मुनीश सहगल यांनी दिली.
काय आहे राफेल लढाऊ विमानांची वैशिष्ट्ये-
1. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
4. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
8. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.