घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याच्या रागात मारहाण, मारहाणीचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:57 AM2017-09-07T02:57:31+5:302017-09-07T02:57:50+5:30

घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याच्या रागात विसर्जन मिरवणुकीदरम्यान माहेरच्या नातेवाइकांकडून मुलीसह तिच्या सासरच्या मंडळीना बेदम मारहाण झाल्याची घटना ठाकूरद्वार परिसरात घडली.

 In a rage, Maratha gets caught in the CCTV footage of Tharar Society | घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याच्या रागात मारहाण, मारहाणीचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याच्या रागात मारहाण, मारहाणीचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

Next

मुंबई : घरच्यांच्या विरोधात लग्न केल्याच्या रागात विसर्जन मिरवणुकीदरम्यान माहेरच्या नातेवाइकांकडून मुलीसह तिच्या सासरच्या मंडळीना बेदम मारहाण झाल्याची घटना ठाकूरद्वार परिसरात घडली. या मारहाणीचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाकूरद्वार परिसरात गेल्या ९ महिन्यांपासून समीक्षा पोफळे (२१) पती पीयूष, सासू, सासरे, दीर, नणंद यांच्यासोबत राहते. गेल्या वर्षी १८ आॅक्टोबर रोजी तिचा पीयूषसोबत विवाह झाला. मात्र या विवाहाला समीक्षाच्या घरच्यांचा विरोध होता. त्याच परिसरात समीक्षाचे चुलत नातेवाईक राहण्यास आहेत. समीक्षाने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून रस्त्यावरून येता-जाता चुलत्यांकडून तिला शिवीगाळ केली जात होती. याबाबत तिने एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांच्याकडून शिवीगाळ सुरूच होती.
सोसायटीच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री ८च्या सुमारास समीक्षा सासरच्या मंडळींसोबत सहभागी झाली. मिरवणूक अर्ध्या वाटेत पोहोचताच त्या मिरवणुकीत चुलत भाऊ सचिन खानविलकर आणि त्याचा मित्र अशोक सहभागी झाला. त्याचवेळी अशोकने तिला मिरवणुकीतून निघून जाण्यास सांगितले. मात्र तिने काहीच प्रतिसाद न दिल्याने दोघांनी तिला मारण्याचा प्रयत्न केल्यावर तिने तेथून पळ काढला. त्यापाठोपाठ सासरच्या मंडळींनीही घाबरून सोसायटी गाठली.
त्याचवेळी चुलत भावासह अन्य नातेवाईक भालचंद्र खानविलकर (४५), सचिन खानविलकर (३५), स्वराज खानविलकर (१९), रेश्मा खानविलकर (४०), प्रज्योत देसाई आणि अशोक भोईटे (५०) यांनी सोसायटीत थांबलेल्या तिच्यासह तिच्या सासरच्या मंडळीना मारहाण केली. समीक्षाने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास कळविले. घटनेची वर्दी लागताच एलटी मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सहाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  In a rage, Maratha gets caught in the CCTV footage of Tharar Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.