लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागात वडिलांनीच माहेरी आलेल्या मुलीची दगडाने ठेचून तर जावयाची चाकूने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना गोवंडी हत्याकांडातून उघड झाली आहे. गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत मुलीच्या वडील, भावासह तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
करण रमेश चंद्र (२२) आणि गुलनाज खान (१९) हिची हत्या केली आहे. १४ ऑक्टोबरला मानखुर्दमधील टेलिकाॅम फॅक्टरी वसाहतीजवळ भुतबावडीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. वैद्यकीय तपासणीमध्ये तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून आणि गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले.
मुलीचा मृतदेह ताब्यातआरोपींना अटक करत नवी मुंबई भागातून मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली. तपासादरम्यान गोरा रईसुद्दीन खान (५०), त्याचा मुलगा सलमान गोरा खान (२२), सलमानचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान, ३ अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हा केला.
आधी जावयाला संपविले, नंतर मुलीला ठेचलेगेल्या वर्षी गुलजान हिने करणसोबत विवाह केला. ती उत्तर प्रदेश येथे राहण्यास होती. काही दिवसांपूर्वी ती पतीसोबत माहेरी आली. मात्र प्रेमविवाहाचा राग कायम असल्याने खानने १३ ऑक्टोबर रोजी करणला खरेदीच्या बहाण्याने बाहेर नेले. नंतर दुपारी भुतबावडीकडे आणून करणच्या मानेवर तीन वार करत हत्या केली.