Join us

माहीममध्ये रहमत मंझिलचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 6:17 AM

माहीम येथे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम सुरू आहे.

मुंबई : माहीम येथे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम सुरू आहे. मात्र या कामाचे हादरे लगतच्या बांधकामांना बसत आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एल.जे. रोड येथील रहमत मंझिलचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या प्रकरणी आपले म्हणणे मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत ही अतिशय जुनी आहे. त्यामुळे इमारतीच्या छताचा काही भाग पडण्याची घटना घडली आहे. सध्या या इमारतीनजीक मेट्रो ३ चे मोठे काम सुरू नाही. त्यामुळे या घटनेचा मेट्रो-३ च्या कामाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने उर्वरित भाग अग्निशमन दलाने पाडला. मेट्रो-३चे काम सुरू होण्यापूर्वी एमएमआरसीद्वारे करण्यात आलेल्या इमारत सर्वेक्षणानुसार ही इमारत गंभीर अवस्थेत असल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानुसारच मेट्रोच्या कामाची आखणी केली. इमारतीवर होत असलेल्या परिणामांची मोजणी करण्यास एमएमआरसीद्वारे सुरक्षा उपकरणे लावली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या धोकादर्शक नोंदी आढळल्या नाहीत.