Join us

राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात १५ मे रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:08 AM

भिवंडी : संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणूक ...

भिवंडी : संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत केले होते. यामुळे संघाचे जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर शनिवारी भिवंंडी न्यायालयात सुनावणी होती. मात्र, या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाला रविवारी जबानी द्यायची होती. परंतु, उच्च न्यायालयात या दाव्याविषयी सुनावणी झाली होती. तो दावा प्रलंबित असल्याने पुढील तारीख मागितली. त्यामुळे न्यायालयाने १५ मे रोजी सुनावणी होईल असे सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना असल्याने राहुल गांधी हजर राहू शकत नाही, असे त्यांच्या वकिलाने अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने सुनावणीसाठी १५ मे तारीख दिली आहे. राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी ही माहिती दिली. भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल यांनी महात्मा गांधींजी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली,असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. १२ जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते.