मुंबई- गेल्या काही दिवसांपासून ठाकरे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरुन आता आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत,आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कनाल यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचाही उल्लेख केला.
"बात घमंड की नहीं...", राहुल कनाल यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटावर केला गंभीर आरोप
राहुल कनाल म्हणाले, काही लोकांच म्हणणे आहे की, हे दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपुत यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी शिंदे गटात गेला असेल. पण हे आरोप माझ्यावर अनेक वेळा केले आहेत. मी सांगतो या प्रकरणाची सर्व चौकशी करा, असंही राहुल कनाल म्हणाले.
कोविड काळात केलेल्या कामाचा दाखला देत राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. "कोविड काळात शिंदे साहेबांच्या सहकार्याने आम्ही खूप काम केलं. पण पक्षातील दोन तीन लोकांनी खूप वाईट राजकारण केलं. काही जण म्हणतात की, मला पार्टीने खूप काही दिले आहे, पण मी सांगतो की मी देखील त्याच्या हजार पटीने दिले आहे. आम्ही कोरोना काळात शिंदे साहेबांप्रमाणे सगळ्यांची सेवा केली. कोविडमध्ये फक्त सेवा केली आहे, त्यामुळे मेवाचा आणि माझा काहीही संबंध नाही", असं कनाल यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.
तसेच सगळ्यांना वाटतं की, तो दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे तिकडं गेला असावा. पण हा आरोप अनेकवेळा केला जात होता आणि आजही करत आहेत. परंतु, कृपया याची चौकशी करा यात मी दोषी आढळलो तर तुम्ही सांगाल तिथे मी जायला तयार आहे, असेही कनाल यांनी शिंदेंसमोर मांडले.