Join us

नार्वेकरांचा ईमेल हॅक, थेट राज्यपालांना मेल! राज्यात सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 7:15 AM

...यामुळे विधानभवनाच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याप्रकरणी मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक झाला असून मेलवरून थेट राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. यामुळे विधानभवनाच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याप्रकरणी मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा सदस्यांमध्ये झालेली वादावादी, बाचाबाचीच्या घटना या पार्श्वभूमीवर सातत्याने विधानभवनातील वागणुकीसंदर्भातील मुद्दा चर्चेला आला होता. नेमका यासंदर्भातीलच मेल थेट विधानसभा अध्यक्षांच्या मेलवरून राज्यपाल बैस यांना गेला आहे. सोमवारी हा मेल राज्यपालांना गेला. या ईमेलची सत्यता तपासणी करण्यात आली असता विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक झाल्याचे समजले.