Join us

राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:27 AM

राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून तर वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज भरला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यवसायाने वकील असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एकूण ३५,३३,२९,६५३ इतकी जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत त्यांची संपत्ती १ कोटीने वाढल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांची स्थावर मालमत्ता सुमारे ४ कोटींनी वाढली आहे. तर, त्यांच्यावर १७,८४,०९,४२९ इतके कर्ज आहे. 

२०१९ मधील संपत्ती           राहुल नार्वेकर     पत्नीची संपत्तीजंगम    १०,५३,८१,४३६    ३९,००,०२२ स्थावर    २४,३१,००,०००    २,८५,००,००० 

२०२४ मधील संपत्ती          राहुल नार्वेकर      पत्नीची संपत्तीजंगम    ७,१७,२९,६५३    ८,५३,१२,३५०स्थावर    २८,१६,००,०००    ८५,९४,६६,०००वाहन    ४७,८८,५८५    नाही सोने    ११,६८,०००    ४८,१८,००० 

पाच वर्षांत शेलारांच्या संपत्तीत १० कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. शुक्रवारी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे. २०१९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ७,१३,५५,१७५ होती. तर, २०१४ मध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रात १७,०५,९१,७८५ संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्यावर ८८,१८,२५० इतके कर्ज आहे. तर, पत्नी प्रतिमा यांच्यावर ९८,७४,९८४ इतके कर्ज आहे.

२०१९ मधील संपत्ती                  आशिष शेलार    पत्नीची संपत्तीजंगम      ४,११,५५,१७५    ३,७९,५५,८८५ स्थावर    ३,०२,००,०००    ३,६४,५०,०००   

२०२४ मधील संपत्ती                आशिष शेलार     पत्नीची संपत्तीजंगम    ८,३४,९१,७८५    १०,४३,५९,५४९स्थावर    ८,७१,००,०००    १२,९६,७६,००० वाहन    ४३,३७,१२२    नाही सोने    १,४४,०००    १०,६३,२२३

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४आशीष शेलारवांद्रे पूर्वकुलाबाराहुल नार्वेकरमुंबई विधानसभा निवडणूक