जामिनासाठी राहुलची उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: April 9, 2016 03:42 AM2016-04-09T03:42:23+5:302016-04-09T03:42:23+5:30

प्रत्युषा बॅनर्जी हिचा प्रियकर राहुल राज सिंग याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Rahul's bail plea in the High Court | जामिनासाठी राहुलची उच्च न्यायालयात धाव

जामिनासाठी राहुलची उच्च न्यायालयात धाव

Next

मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी हिचा प्रियकर राहुल राज सिंग याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याला अटक होणार की नाही हे सोमवारीच स्पष्ट होईल, असे बांगुरनगर पोलिसांनी सांगितले. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांनी राहुलविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रत्युषाने आर्थिक तणावातून आत्महत्या केली असावी असे राहुलने कोर्टात दिलेल्या जमीन अर्जामध्ये म्हटले आहे. तिच्यावर चार बँकांचे कर्ज होते. ज्याचे हफ्ते तिला भरता येत नव्हते. मला तिच्याशी लग्न करायचे होते, मी तिला एक हिऱ्याची अंगठी देखील दिली होती, असेही त्याने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rahul's bail plea in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.