दिवसाढवळ्या घरात घुसून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: March 28, 2017 06:35 PM2017-03-28T18:35:11+5:302017-03-28T18:35:11+5:30

नागपाडा येथील एका दाम्पत्यावर दिवसाढवळ्या घरात घूसून प्राणघातक हल्ला चढविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यात पत्नीचा मत्यू तर पतीची प्रकति चिंताजनक आहे.

A raid on a couple of days and a raid on a couple of days | दिवसाढवळ्या घरात घुसून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

दिवसाढवळ्या घरात घुसून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 : नागपाडा येथील एका दाम्पत्यावर दिवसाढवळ्या घरात घूसून प्राणघातक हल्ला चढविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यात पत्नीचा मत्यू तर पतीची प्रकति चिंताजनक आहे. समीरा जुल्फी दळवी (४०) असे मत पत्नीचे नाव आहे. तर पती जुल्फी (४९) यांच्यावर जे.जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
मुळचे गुहागर येथील रहिवासी असलेले दळवी दाम्पत्य नागपाडा येथील बच्चुभाई कम्पाऊण्डमध्ये भाडे तत्त्वावर राहतात. नुकतेच ते इथे राहण्यास आले होते. त्यांना तीन मुले असून ते गुहागरला असतात. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आला तेव्हा अर्धवट उघडा असलेल्या दरवाजातून त्याने आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा दोघेही रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने आरडा ओरडा करत स्थानिकांना बोलावून घेतले. त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले. यामध्ये समीरा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मत घोषित करण्यात आले होते. तर जुल्फी यांच्यावर येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. जुल्फी हे देखील रात्री साडे नऊच्या सुमारास आम्ही झोपी गेलो. त्यानंतर काहीच आठवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची त्याच परिसरात पानटपरी आहे. कोणीतरी धारदार शस्त्राने त्यांच्यावर क्रुरपणे वार करत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. हत्या आणि हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A raid on a couple of days and a raid on a couple of days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.