Raigad: उन्हाचा पारा वाढल्याने पुन्हा माठांना मागणी
By निखिल म्हात्रे | Published: May 17, 2024 08:36 PM2024-05-17T20:36:26+5:302024-05-17T20:37:12+5:30
Raigad: गेला महिनाभर रायगडमध्ये उन्हाचा पारा चाळीशीच्या घरात होता. त्यामुळे रायगडकरांनी माठाबरोबर जारच्या पाण्याला पसंती दिली होती. मात्र, जारच्या पाण्यामुळे आजार उद्भवत असल्याने पुन्हा माठांना मागणी वाढली आहे. माठ शंभर रुपयांपासून साडेचारशे रुपयांपर्यंत मिळत आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - गेला महिनाभर रायगडमध्ये उन्हाचा पारा चाळीशीच्या घरात होता. त्यामुळे रायगडकरांनी माठाबरोबर जारच्या पाण्याला पसंती दिली होती. मात्र, जारच्या पाण्यामुळे आजार उद्भवत असल्याने पुन्हा माठांना मागणी वाढली आहे. माठ शंभर रुपयांपासून साडेचारशे रुपयांपर्यंत मिळत आहेत.
फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठाचे पाणी आरोग्यासाठी चांगले असल्याने माठांना उन्हाळ्यात मागणी असते. यंदा रायगडचा पारा चांगलाच तापला होता. त्यामुळे माठातील पाण्यावर तहान भागत नसल्याने रायगडकरांनी जारच्या पाण्याला पसंती दिली होती. मात्र, जारचे पाणी अधिक थंडगार असल्याने त्याने आजार उद्भवत आहेत. त्यामुळे माठांना मागणी वाढली आहे. अलिबाग येथील तळकरनगरमध्ये लहान - मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
माठांचे दर (रुपयांमध्ये)
काळा लहान माठ : ११०
मध्यम माठ : २२०
मोठा माठ : २८०
नळ लावलेला काळा माठ : २८०
काळा लहान रांजण : २५०
मोठा रांजण : ५००
लाल लहान माठ : १२०
मध्यम माठ : २४०
मोठा माठ : २८०
नळ लावलेला लाल माठ : २८०
मार्च, एप्रिल व मे हा तीनच महिने माठांचा हंगाम असतो. माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महागले आहे. त्यामुळे माठ बनविणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही आम्ही ग्राहकांना परवडतील असेच दर ठेवलेले आहेत. ग्राहकांनीही भाव न करता सहकार्य करावे.
- समीर पालवणकर, माठ व्यावसायिक.