Join us

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला मुसळधारेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला तरी महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला तरी महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. २८ जुलै रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रातदेखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २८ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी अधून - मधून वाऱ्याच्या जोरदार वेगासह पावसाच्या सरी कोसळल्या असून, याच काळात ऊनही पडले होते. बुधवारीदेखील मुंबईत असेच हवामान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.