भुसावळ येथे रेल नीर बाटल्यांचा प्रकल्प, प्रकल्पासाठी आठ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:23 AM2020-01-05T05:23:22+5:302020-01-05T05:23:30+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल नीर बाटल्यांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Rail Neer bottles project at Bhusawal, costing Rs. 8 crores for the project | भुसावळ येथे रेल नीर बाटल्यांचा प्रकल्प, प्रकल्पासाठी आठ कोटींचा खर्च

भुसावळ येथे रेल नीर बाटल्यांचा प्रकल्प, प्रकल्पासाठी आठ कोटींचा खर्च

Next

कुलदीप घायवट 
मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल नीर बाटल्यांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एका दिवसात सुमारे ७२ हजार बाटल्या बनविण्यात येतील. त्यामुळे येथील जवळील स्थानकातील प्रवाशांना रेल नीर बाटल्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) यांच्याद्वारे रेल नीर प्र्रकल्प उभारला जात आहे. ८ कोटी १९ लाख रुपये खर्चात भुसावळमधील एमआयडीसी परिसरात प्रकल्प तयार केला जात आहे.
भुसावळ येथे ८ हजार ५५३ चौ.मी.मध्ये प्रकल्प उभा केला जाणार आहे. या प्रकल्पाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर डिसेंबर २०१९मध्ये प्रकल्प उभा राहणार होता. मात्र काही कारणास्तव प्रकल्प रखडला गेला. मात्र पुन्हा या प्रकल्पावर जोरदार काम सुरू आहे. एप्रिल २०२०मध्ये प्रकल्प पूर्ण करण्यात येण्याची माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी रेल नीर पाण्याच्या बाटल्या तयार करण्याचा प्रकल्प आहे. या प्र्रकल्पांद्वारे सुमारे २ लाख एक लीटरच्या पाण्याच्या बाटल्या भरल्या जातात. येथून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकावर पाणीपुरवठा केला जातो. आता भुसावळ या ठिकाणी रेल नीरच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकावर रेल नीरचा पुरवठा केला जाईल.
>५०० मिली रेल नीर बाटल्यांचा प्रस्ताव रखडला
भुसावळ येथे उभारण्यात येणाºया रेल नीरच्या बाटल्या या एका लीटरच्या असणार आहेत. त्यामुळे ५०० मिलीच्या रेल नीरची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे बोर्डाकडून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ५०० मिली रेल नीर बाटलीची विक्री सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. दिल्ली येथे ५०० मिलीच्या रेल नीरच्या बाटल्या तयार करण्याचा प्रकल्प आहे. मात्र देशभरातील इतर रेल नीर प्रकल्पात ५०० मिली रेल नीरच्या बाटल्या बनविण्याची सुविधा नाही. परिणामी प्रवाशांची मागणी प्रलंबित आहे.

Web Title: Rail Neer bottles project at Bhusawal, costing Rs. 8 crores for the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.