मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले रेल्वे पोलीस नव्या जॅकेटमध्ये दिसत आहेत. गेल्या पाच, सहा दिवसांपासून रेल्वे पोलीस, होमगार्डसह महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना गडद भगव्या रंगाचे रेडियम असलेले जॅकेट देण्यात आले आहे. मात्र या जॅकेटमुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची भीती कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत/कसारापर्यंत धावते. पश्चिम मार्गावर चर्चगेट ते विरार/डहाणू/पालघर या मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंत लोकल सेवा आहे. रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांसह सर्वच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे कर्मचारी नियुक्त आहेत. मात्र रात्रीच्या वेळी ते ड्युटीवर हजर राहत नसल्याच्या तक्रारीरेल्वे पोलीस आयुक्तालयाला आल्या आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी कर्मचाºयांना जॅकेट देण्यात आले आहे.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या मते, प्रवाशांना पोलीस चटकन ओळखता यावेत तसेच सुरक्षारक्षक आॅन ड्युटी राहावे म्हणून ही शक्कल रेल्वे पोलीस महासंचालनालयाने लढवली आहे. त्यानुसार कर्तव्यावर रुजू होताच आपआपल्या रेल्वे पोलीस स्थानकातून रजिस्टरमध्ये सही करून हे जॅकेट ताब्यात घ्यायचे आणि ड्युटी संपताच हे जॅकेट पुन्हा संबंधित रेल्वे पोलीस स्थानकात जमा करायचे, असा नियम आहे. मात्र हे जॅकेट धुतले जात नसल्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाचे जॅकेट दुसºयाला आणि दुसºयाचे तिसºयाला मिळत असल्याने संसर्गजन्यआजार बळावण्याची शक्यता कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.रेल्वे पोलिसांना दिलेले जॅकेट हे एका व्यक्तीला कायमस्वरूपी देण्यात येत नाही. त्यामुळे आज मिळालेले जॅकेट हे उद्या मिळेलच याची खात्री नाही. परिणामी एकाचे जॅकेट दुसºयाला आणि दुसºयाचे तिसºयाला मिळण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईच्या दमट वातावरणात अंगाला घाम जास्त येतो. त्यामुळे संसर्गजन्य आजर पसरून कर्मचाºयांना त्वचा रोग होण्याची शक्यता बळावते. हे टाळण्यासाठी जॅकेट धुण्यासोबत ते स्वच्छ जागेत ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.असे आहे जॅकेटगडद भगव्या रंगाचे हे जॅकेट आहे.जॅकेटला रेडियम लावण्यात आले आहेत.जॅकेटच्या डाव्या छातीवर महाराष्ट्र पोलीसचे चिन्ह आहेजॅकेटच्या मागे ‘महा जीआरपी’ असे लिहिण्यात आले आहे.पोलीस ओळखता यावेत यासाठीच जॅकेटगर्दीच्या ठिकाणी पोलीस त्वरित ओळखता यावेत, यासाठी रेल्वे पोलीस, होमगार्ड महाराष्टÑ सुरक्षादलाच्या जवानांना हे जॅकेट दिले आहे. कोणतीही नवीन गोष्ट आल्यानंतर त्यात काही त्रुटी असू शकतात. यामुळे याबाबत काही तक्रारी असल्यास त्या नक्कीच सोडवण्यात येतील.- निकेत कौशिक, आयुक्त, रेल्वे पोलीस
रेल्वे पोलिसांना जॅकेटचा जाच!
By महेश चेमटे | Published: February 23, 2018 6:23 AM