Join us

रे रोड, कॉटनग्रीन, शिवडी, वडाळा, मानखुर्द रेल्वे स्थानके अस्वच्छ; तपासणीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 2:18 AM

गणेशोत्सवानिमित्त रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्थानकांची पाहणी

मुंबई : रेल्वे बोर्डाकडून प्रत्येक स्थानक स्वच्छ ठेवण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाला आले असतानादेखील हार्बर मार्गावरील स्थानके गलिच्छ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रवाशांना गणेशोत्सव काळात गलिच्छ स्थानकावर प्रवास करावा लागतोय. गणेशोत्सवानिमित्त रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्थानकाची तपासणी केली असता, हार्बर मार्गावरील स्थानके अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले.

हार्बर मार्गावरील डॉकयार्ड स्थानकावर फलाट क्रमांक १ वर सफाई कामगार नसल्याने स्थानकावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. या स्थानकाहून कल्याण दिशेकडे जाणाºया रेल्वे रुळावर जागोजागी अस्वच्छता होती. रे रोड, कॉटनग्रीन, शिवडी, वडाळा, मानखुर्द स्थानकांवरील रेल्वे रुळांवर ठिकठिकाणी घाण, कचरा आढळून आला. यासह या स्थानकावरील फलाटावर सफाई कामगारदेखील नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे.

चुनाभट्टी, मानखुर्द, वाशी, बेलापूर, पनवेल या रेल्वे स्थानकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या ठिकाणांवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा दिसण्यास अडथळा निर्माण होत असल्याचेही तपासणीत आढळून आले.अंमलबजावणी नाहीमध्य रेल्वे प्रशासन मोठमोठ्या योजना आणते. मात्र, यावर कोणतीही अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांची दिशाभूल करते. रेल्वे स्थानक, लोकल साफ ठेवणे रेल्वेचे काम आहे. मात्र, विविध मोहिमांच्या नावाखाली काहीही करत नाही. साफसफाई करणे दररोजचे काम आहे. यात कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.किंग्ज सर्कल स्थानकावर सुशोभीकरणकिंग्ज सर्कल स्थानकावर दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. नुकतीच या स्थानकावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करण्यात आली आहे. मुंबई विभागातील किंग्ज सर्कल हे स्थानक स्वच्छ आणि सुंदर असल्याची प्रतिक्रिया स्टेशन प्रबंधनक एन. के. सिन्हा यांनी दिली.मध्य रेल्वे म्हणते, आमची सफाईची कामे जोरदार सुरूमध्य रेल्वे मार्गावरील स्थानकावर १० दिवसांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातून रेल्वे स्थानके स्वच्छ करण्यात येत असून, स्थानक, शौचालये साफ ठेवली जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :रेल्वे