लोकल वेळेत धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार, शंभर दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:13 AM2019-06-27T03:13:56+5:302019-06-27T03:14:26+5:30

मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची बुधवारी साडे तीन तासांची बैठक झाली.

The railway administration will endeavor to run local time, a hundred-day deadline | लोकल वेळेत धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार, शंभर दिवसांची मुदत

लोकल वेळेत धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार, शंभर दिवसांची मुदत

Next

मुंबई - मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची बुधवारी साडे तीन तासांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे उशीराने चालविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिले. १०० दिवसांच्या कालावधी लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यासाठी येण्याचे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनानी प्रवासी संघटनेला दिले. त्यामुळे प्रवासी संघटनांनी १ जुलै रोजी करण्यात येणारे आंदोलनाचा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत मध्य रेल्वेनी दिवा - कल्याण दरम्यान ५ वी ते ६ वी मार्गिकेच्या वापर मेल एक्स्प्रेस साठी करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रुळांची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उचललेले कॉशन आॅर्डर कमी केले जाईल. काही मेल एक्स्प्रेसला कल्याण ऐवजी पनवेल येथे वळविण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहेत. रेल्वे रुळाला क्रॉसिंग मध्ये दरड कोसळण्याच्या घटना थांबविण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेण्यात येणार आहे. लोकल सेवाची गती वाढविण्यात येणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रवासी संघटना मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहेत.

उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस मोठ्या प्रमाणात आल्याने काही लोकल उशीराने धावतात. मेल, एक्स्प्रेसचा परिणाम लोकलवर होऊ नये. त्यामुळे मेल, एक्स्प्रेसच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले, असे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.
लोकलचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वे मार्गावर नवीन उपाययोजना करण्यात असल्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले असल्याचे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन होणार

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळाला तडे जाण्याच्या घटना दररोज घडत असतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने रुळ बदलण्यात येईल. मुंबई लोकल पूर्णत: वक्तशीरपणांमध्ये धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे १०० दिवसांच्या मुदतीत लोकल वक्तशीरपणात धावेल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. १०० दिवसात बदल झाला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले़
 

Web Title: The railway administration will endeavor to run local time, a hundred-day deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.