रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:04 PM2020-04-19T19:04:29+5:302020-04-19T19:05:02+5:30

पार्सल गाड्यामधून औषधे, मास्क, पीपीई किटची सारख्या सामुग्रीची वाहतूक; देशभरातील रेल्वे विभागातून १ हजार १५० टन औषधाचा पुरवठा

Railway administration's fight against Corona | रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई

रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई

googlenewsNext


मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून कोरोना विरुद्ध   लढाई सुरु आहे.  कोरोनाशी लढायला लागणाऱ्या सामग्रीची वाहतूक सुरु आहे. पश्चिम, मध्य यासारख्या देशभरातील प्रत्येक रेल्वे विभागातून फक्त मालगाड्यांची आणि पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. प्रत्येक विभागातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, काही पीपीई किटची वाहतूक केली जातेय. लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा केला आहे. 

कोरोना विषाणूशी झुंज देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरु आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. फक्त मालगाडी, पार्सल गाडयांची सेवा सुरु आहे.  याद्वारे नागरिकांना दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या वस्तुंना प्राधान्य देऊन त्यांची वाहतूक केली जात आहे.

सर्वाधिक मास्क, सॅनिटायझर आणि औषधांची वाहतूक उत्तर रेल्वे प्रशासनाकडून केली गेली आहे. त्यांच्याद्वारे ३९९.७१ टन औषधांची वाहतूक केली आहे. त्यानंतर पश्चिम रेल्वेने ३२८.८४ टन आणि मध्य रेल्वेने १३५.६४ टन  औषधांची वाहतूक केली आहे.
---------------------------

  • देशातील रेल्वे विभाग
  • उत्तर रेल्वे     ३९९.७१
  • पश्चिम रेल्वे ३२८.८४
  • मध्य रेल्वे १३५.६४
  • दक्षिण रेल्वे ८३.१३
  •   उत्तर मध्य रेल्वे ७४.३२  
  •   दक्षिण मध्य रेल्वे     ४७.२२  
  •   पश्चिम मध्य रेल्वे २७. १७    
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे १५.१०
  • दक्षिण पश्चिम  रेल्वे १२.१०
  • पूर्व रेल्वे ८.५२
  • उत्तर पश्चिम रेल्वे ८.२२
  •  उत्तर पूर्व रेल्वे २.८८
  • दक्षिण पूर्व रेल्वे २. ८२
  •   उत्तर पूर्व फ्रंटिअर रेल्वे २.१६  
  • पूर्व मध्य रेल्वे १.२८  
  • पूर्व कोस्टल रेल्वे १.०६

 ---------------------------
एकूण   १ हजार १५०. १७ टन
(वरील संख्या टनामध्ये आहे )
---------------------------

Web Title: Railway administration's fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.