रेल्वेच्या आपातकालीन कक्ष दिवसाला १३ हजार शंकाचे निरासन करते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:37 PM2020-04-28T18:37:42+5:302020-04-28T18:38:18+5:30
रेल्वेला प्रवाशांकडून दररोज विचारल्या जात आहेत शंका
मुंबई : कोरोनाविषयी प्रश्न, समस्या, लोकल कधी सुरु होईल याची माहिती प्रवाशाकडून रेल्वेच्या आपातकालीन कक्षाला विचारली जात आहे. प्रवाशांच्या विविध प्रश्नांना उत्तरे या कक्षाकडून दिली जातात. परिणामी, रेल्वेच्या आपातकालीन कक्षाद्वारे दररोज सुमारे १३ हजार शंका सोडवल्या जातात.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने प्रीमियम, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरीय गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे सेवा ३ मे पर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाड्या कधी सुरु होती. तिकीट परतावा कसा मिळेल, कोरोना विषयी माहिती प्रवाशांकडून रेल्वेच्या आपातकालीन कक्षाला विचारली जाते. प्रवाशांना योग्य आणि अचूक माहिती देण्यासाठी देशातील ४०० रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांचा एक आपातकालीन कक्ष रेल्वेकडून स्थापन करण्यात आली आहे. यावरून प्रवाशांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली जातात. प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ५ प्रकारच्या माध्यमांचा वापर रेल्वेकडून केला जातो. यात हेल्पलाईन क्रमांक १३८, १३९, सोशल मीडिया, ईमेलची आणि वन टू वन कॉल करून मदत घेतली जात आहे.
या कक्षामध्ये दिवसाला १३ हजार शंका विचारल्या जातात. त्यापैकी ९० टक्के शंका या वन टू वन सोडविण्यात येतात. रेल्वे हेल्पलाईनच्या १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर लॉकडाऊनच्या पहिल्या ४ आठवड्यांमध्ये २ लाख ३० हजार शंका विचारण्यात आल्या. तर, १३८ या हेल्पलाईन क्रमांकावर १ लाख १० हजार शंका विचारण्यात आल्या आहेत.
--------------------------------------
जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केल्याने रेल्वेचे सर्वत्र कौतुक
कोरोनामुळे देशातील सर्व वाहतुकीसह प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा बंद आहे. फक्त पार्सल, मालगाडी सुरु आहे. दूध, धान्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, मासे, अंडी, बियाणे, टपाल पिशव्या, कच्चा माल, इंधन, सिमेंट यासारख्या जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केली जात आहे. यामुळे नागरिकांना याचा खूप उपयोग होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून, रेल्वेचे कौतुक केले जात आहे.