महागाई भत्याचा पुढील टप्प्या जुलै २०२१ असणार
मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशातील आर्थिक गणित बिघडली आहेत. याचा थेट फटका रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वाढीव महागाई भत्त्यावर बसला आहे. महागाई भत्ताचा पुढील टप्पा जुलै २०२१ नंतर मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना आर्थिक झळ बसणार आहे.
केंद्र सरकारमध्ये मोडणाऱ्या रेल्वे कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून थकित असणारा हा वाढीव भत्ता देण्यात केंद्र सरकारने आता थांबविण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आलेला महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आता १ जानेवारी २०२० , १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून वाढणारा महागाई भत्ता थांबवण्यात आला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ पर्यंत वाढीव महागाई भत्ता दिला जाणार नाही.
रेल्वे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे तीन टप्पे मिळणार होते. मात्र आता पुढील दीड वर्षासाठी मिळणार नाहीत. महागाई भत्त्याचा पुढील टप्पा आता थेट जुलै २०२१ असणार आहे. यामुळे देशातील रेल्वे कर्मचाऱ्यातील घरातील अर्थचक्र विस्कटले जाणार आहे.