रेल्वे कर्मचारी ठरताहेत प्रवाशांचे जीवरक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:05 AM2020-12-09T04:05:41+5:302020-12-09T04:05:41+5:30

२०२० मध्ये आतापर्यंत १३ जणांचे प्राण वाचवले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासनीस, महाराष्ट्र ...

Railway employees are the lifeguards of the passengers | रेल्वे कर्मचारी ठरताहेत प्रवाशांचे जीवरक्षक

रेल्वे कर्मचारी ठरताहेत प्रवाशांचे जीवरक्षक

Next

२०२० मध्ये आतापर्यंत १३ जणांचे प्राण वाचवले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासनीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्टेशन कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून २०२० मध्ये आतापर्यंत १३ प्रवाशांचे प्राण वाचवले. यासाठी काही वेळा स्वत:चा जीवदेखील त्यांनी धोक्यात घातला होता.

सतर्क आरपीएफ जवान प्रवाशांचे प्राण वाचवतात, जे प्रवासी निष्काळजीपणे वागतात आणि धावत्या गाड्यांमध्ये चढताना किंवा प्रवासादरम्यान धोक्याचा सामना करतात. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतात. २०२० मध्ये मुंबई उपनगरी नेटवर्कवर, अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे कल्याण स्टेशनवर प्राण वाचवण्यात आले. त्यापैकी बहुतेक जण लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढत अथवा उतरत होते. गेल्या वर्षी २०१९ मध्ये २१ पैकी दादर स्थानकात ७ आणि भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकात प्रत्येकी २ जणांचे प्राण वाचविण्यात आले.

नुकताच २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९.०५ वाजता साहाय्यक निरीक्षक आरपीएफ विजय सोलंकी यांनी कल्याण स्टेशनवर आपले कर्तव्य बजावत असताना कल्याणमधील रहिवासी सोनी गोविंदा यांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात गाडी आणि प्लॅटफॉर्म याच्या मधून ट्रॅकवर पडताना पाहिले. धावतच जाऊन त्यांनी तिला ताबडतोब बाहेर काढले आणि जीव वाचला.

* दुसऱ्या प्रवाशाच्या मदतीने काढले बाहेर

लेडी आरपीएफच्या साहाय्यक निरीक्षक पिंकी कुमारी यांनी कल्याण स्टेशनवर २१ ऑक्टोबर रोजी प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेवत असताना एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले. त्यांनी त्याला ट्रेनमध्ये चढण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उडी मारून तोल गमावून बसला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडला. पिंकी यांनी दुसऱ्या प्रवाशाच्या मदतीने त्याला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.

Web Title: Railway employees are the lifeguards of the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.