रेल्वे प्रशासन लोकल वेळापत्रकात अंशत: बदल करून नवीन वेळापत्रक प्रवाशांच्या माथी मारते. त्यामुळे वेळापत्रक बदलून फरक पडत नाही. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याने गर्दी कमी होताना दिसत नाही. दररोज काही फे-या रद्द केल्या जातात. दररोजची गर्दी, धक्काबुक्की, भांडणे प्रवाशांना सहन करावी लागतात. एक्स्प्रेसपेक्षा लोकलला प्राधान्य द्या, डहाणू-विरार चौपदरीकरण लवकरात लवकर करा, दिवा-वसई रोड मार्गावर गाड्यांच्या फे-या वाढवा, खोपोली आणि कसारा दिशेकडील लोकल सेवांमध्ये वाढ करण्याची मागणी ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर केली.
रेल्वेने कात टाकावीमध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल वेळापत्रकानुसार सुटतच नाहीत. दोन लोकलच्या वेळात काही मिनिटांचे अंतर असल्याने उपनगरी प्रवाशांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लोकलच्या वेळेतील तफावत दूर करून कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकल कशा सोडता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दर दिवशी किमान ९ ते १० प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. यास रेल्वेच जबाबदार आहे. कारण प्रवासीसंख्या लाखांच्या पटीत वाढत आहे. तरीही लोकल उपलब्ध नाहीत, म्हणून लोकल फेºया वाढवता येत नाहीत. रेल्वे खात्याची ही अशीच भूमिका राहिली, तर एक दिवस हे सारे उपनगरी प्रवासी रेल्वे खात्याला असा काही धडा शिकवतील की रेल्वेला त्यांना आवरणे कठीण जाईल. हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आपली जुनी कात टाकायला पाहिजे. तेव्हाच रेल्वे प्रवास वेळेवर आणि सुरक्षित होईल. वाढत्या प्रवासीसंख्येच्या मानाने दिवा-पनवेल, डहाणू-वसई-पनवेल, पनवेल-कर्जत, पनवेल-पेण, विरार-डहाणू या मार्गावरही फेºया वाढवण्याबाबत प्रवाशांच्या मागणीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जात आहे. सीएसएमटीवरून कल्याण दिशेकडे जाणाºया रात्री उशिरापर्यंत लोकल आहेत. मात्र, कल्याणवरून रात्री ११.५२ नंतर सीएसएमटीला जाणारी एकही लोकल नाही. प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या सुटसुटीत लोकल उपलब्ध करून द्यायला हव्यात, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे; पण आमचे लोकप्रतिनिधीही मतापुरतेच रेल्वे प्रवाशांच्या समस्येचे राजकारण करतात, बाकी त्यांना आपले काहीच पडलेले नाही याचा अनुभव अनेकदा येतो. - मुरलीधर धंबा, डोंबिवलीजग कुठे पोहोचले, तरी लोकलचा प्रश्न सुटेनाआपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी चालवली आहे; पण आपले रेल्वे प्रशासन गेली २८ वर्षे वसई-दिवा मार्गे साधी लोकल चालू शकत नाही, हा विचार किती निराश करणारा आहे. तरी आता रेल्वेने वेळापत्रकात थोडा बदल करून आणखीन लोकलच्या फेºया वाढवल्यास अत्यंत उपकार होतील. सकाळी ९ च्या सुमारास, ११ च्या सुमारास वसईवरून दिव्याला गाडी सोडली पाहिजे. सायंकाळी ७.३० वाजता दिव्यातून वसईपर्यंत एक गाडी वेळेवर सोडण्यात यावी, अशाने बºयाच प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होईल.- ग्रेटा गोन्साल्विस, प्रवासीगर्दीचे नियोजन झालेच पाहिजेमुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा होत आहे. लोकल प्रवास सुरळीत व्हावा, वेळेवर व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, सातत्याने कोलमडणारे वेळापत्रक, प्रचंड गर्दी, यामुळे प्रवास करणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे एखाद्या स्टेशनवरील प्रवासी संख्या, रोज एका स्टेशनवरून किती प्रवासी लोकलने प्रवास करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून रेल्वेचे वेळापत्रक बनवले, तरच लोकल लोकल सेवा सुरळीत चालू शकेल. - नेहा सानप, कल्याण
महिला डब्यांच्या संख्येत वाढ करावीप्रवाशांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोकलची संख्या वाढविण्यात यावी. लोकल वेळापत्रकाचे नियोजन व्यवस्थित नाही. दुपारी लोकल कमी असल्याने अडचणी येतात. महिलांच्या डब्यामध्ये वाढ करण्यात यावी. रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यामध्ये सुरक्षारक्षकांची व्यवस्था करावी. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने लोकलची संख्या वाढवावी. सर्व लोकल नियोजित वेळेत धावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.- कोमल काळकुटे, कल्याणरेल्वे प्रशासनाने प्रवाशांशी चर्चा करून वेळापत्रक तयार करावेथोड्याफार स्वरूपाचे बदल करून वर्षांतून एकदा वेळापत्रक बदलण्यात येते. गर्दीच्या वेळेत ठरावीक अंतराने नियमितपणे लोकल चालविल्यास गर्दी होणार नाही याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. रेल्वेमार्गांत कुठलाही अडसर नसताना लोकल वाढविल्या जात नाहीत, लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस आणि उपनगरी लोकल यांच्या वेळेत योग्य ती सांगड घालावी. प्रवासाची सोय करणे, हे रेल्वेचे कर्तव्य आहे. जुन्या पद्धतीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे. लोकलची गती वाढल्यावर होणाºया प्रवाशांच्या वर्दळीवर उपाययोजना कराव्यात. सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिकांना समांतर जादा मार्गिकेची नितांत गरज आहे. तसेच जलद लोकलच्या ठरलेल्या स्थानकांचे उदा. कुर्ला, घाटकोपर, ठाणे, वांद्रे, अंधेरी हे बदलून त्यांच्या बदली इतर स्थानकांवर थांबे देण्याचा प्रयोग केला जावा. रेल्वेने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांशी चर्चा करून वेळापत्रकात फायदेशीर बदल घडवून आणणे गरजेचे आहे.- स्नेहा राज, गोरेगावआसनगाव-कसारा लोकल फे-या वाढवारेल्वे प्रशासन कल्याण, पनवेल, विरार या भागात अनेक लोकल सेवा चालवते. मात्र, त्यापुढील प्रवाशांचे खूप हाल होतात. दिवा-वसई सेक्शनला उपनगरीय दर्जा देऊन वर्षे उलटून गेली. मात्र, लोकल सेवा चालू होत नाही. त्याचप्रमाणे पनवेल-कर्जत मार्गावरूनही लोकल सेवा सुरू करण्याची गरज आहे. नेहमीच उपेक्षित राहिलेल्या कल्याण-कसारा- कर्जत मार्गावर वाढत्या प्रवासीसंख्येमुळे अधिकच्या लोकल सेवा सुरू होणे, हे अत्यंत निकडीचे आहे. मात्र, रेल्वे प्रशासन कल्याण-ठाणे लोकल वाढवते. मात्र, कसारा, कर्जतकडे दुर्लक्ष करते. रेल्वेकडे रेक नाहीत, मनुष्यबळ नाही, अशी कारणे पुढे करून या भागातील प्रवाशांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली जातात. निदान या भागातील टिटवाळा, आसनगाव, नेरळ पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, या स्थानकांवर जास्तीत जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देऊन प्रवाशांना दिलासा द्यायला हवा. लांबपल्ल्यांच्या अतिशय मर्यादित लोकल असतात. मात्र, त्यात कल्याण, डोंबिवली, ठाणे, बोरीवली, वसई या स्थानकांवरूनच फार मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. या बाबतही रेल्वे प्रशासनाकडूनच काही तरी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. आसनगाव-कसारा रेल्वे मार्ग प्रशासनाने उपेक्षित ठेवला आहे. या भागातील प्रवाशांना लोकल सेवा वाढवून दिलासा देणे गरजेचे आहे. वेळापत्रकात रेल्वेकडून अपेक्षा तर भरपूर आहे. मात्र, दरवेळी लांबपल्ल्यांच्या प्रवाशांना दुर्लक्षितच केले जाते.- अनंत बोरसे, शहापूर
डहाणू-विरार चौपदरीकरण पूर्ण कराडहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गर्दीच्या वेळी डहाणूकडे जाणाºया लोकलच्या फेºया वाढविण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांकडून अनेक वेळा मागण्या केल्या जातात. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. डहाणू-विरार चौपदरीकरण रखडलेले आहे. भूमिअधिग्रहणच्या कारणास्तव त्याला कुठेतरी प्रथम प्राधान्य देऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात यावा, तसेच स्वयंचलित सिग्नल प्रणाली चर्चगेट ते डहाणूपर्यंत सुरू असल्याने काही फेºया वाढविणे शक्य आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील तांत्रिक बाबी योग्य रीतीने हाताळून येणाºया नवीन वेळापत्रकात डहाणूकडील प्रवाशांना दिलासा द्यावा.- दयानंद पाटील, सचिव, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थाक्रॉसिंगचे प्रमाण कमी करावेसकाळी ६.३० ते सकाळी ९.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळात मेल, एक्सप्रेसची वाहतूक बंद असावी. या वेळात उशिराने धावणाºया मेल, एक्स्प्रेसमुळे लोकलचा खोळंबा होतो. लोकलचे वेळापत्रक हे प्रवासी नियंत्रक आणि गर्दी विभाजक असावे. एका लोकलच्या गर्दीचा ताण दुसºया लोकलवर होणार नाही, याची काळजी वेळापत्रकात घेण्यात यावी. कल्याण स्थानकातून कर्जत, कसारा या मार्गावर शटल/लोकल सेवा सुरू करावी. तसेच वसई- दिवा या मार्गावर शटल/लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी. लोकल वेळेवर पोहोचण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगचे प्रमाण कमीत कमी करावे. रेल्वे स्थानकातील पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकल कोणत्या फलाटावर येणार आहे, हे आधीच दर्शविण्यात यावे, त्यामुळे प्रवाशांना धावपळीचा त्रास कमी होईल. रेल्वे मंत्रालय व प्रशासन यांच्या लक्षात असेल तर पाचव्या आणि सहाव्या मार्गाकडे लक्ष देण्याची तसदी घेतली. आता सुपरफास्ट लोकलचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.- अशोक पोहेकर, उल्हासनगर
लोकलच्या फे-यांची संख्या वाढविणे हीच अपेक्षादरवर्षी मुंबई उपनगरी रेल्वे प्रशासन वेळापत्रकात थोडेफार बदल करत असते; पण मुंबई परिक्षेत्रातील वेगाने वाढत जाणाºया लोकसंख्येमुळे या भागातील प्रवाशांना नवीन वेळापत्रकापासून खूपच अपेक्षा असतात. दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, टिटवाळा, आसनगाव भागातील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुकर व्हावा म्हणून वेळापत्रकात विचार व्हावा. नेरुळ, खारकोपर (उरण) या नवीन उपनगरीय रेल्वेमार्गावरील फेºया वाढविण्याची प्रवाशांची अपेक्षा आहे. दिवा-वसई या मार्गावरील लोकलची संख्याही वाढविली जावी. नवीन वेळापत्रकाकडून प्रवाशांच्या अपेक्षा तर खूप आहेत; पण रेल्वे प्रशासन त्या कशा पूर्ण करणार हा खरा प्रश्न आहे. - प्रदीप मोरे, अंधेरीदिवा-वसई प्रवाशांना दिलासा द्यामी, दिवा-वसई या मार्गावरून प्रवास करते. आता सध्या सकाळी ७ ते ९.५० पर्यंत एकही लोकलची फेरी नाही. दिवा-वसई प्रवाशांसाठी वेळापत्रकातून दिलासा मिळेल, असे वेळापत्रक तयार केले पाहिजे.- लता घरत, प्रवासीठाणे गर्दीचे स्थानकनवीन वेळापत्रकात सायंकाळी ७ ते रात्री १० च्या दरम्यान कल्याण, खोपोली, कसारा, दिशेकडे जाणाºया लोकलचीसंख्या वाढविण्यात यावी. यासह या दिशेकडे जाणाºया दोन लोकलमधील वेळ कमी असणे आवश्यक आहे. सायंकाळी सीएसएमटीहून ठाणे जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. - मंगेश पोफाळे, प्रवासीमी, वसई रोड ते भिंवडी रोड असा प्रवास करतो. मेमूने सकाळी ९.४५ वाजता प्रवास करतो. मात्र, त्यानंतर कोणतीही गाडी उपलब्ध नाही. सरळ १२.१० वाजता गाडी आहे. त्यामुळे ११ वाजण्याच्या दरम्यान गाडी सोडण्यात यावी.- गोरक्षा धानापुरे, प्रवासीदिवा-वसई रोड मार्गावर गाड्यांच्या फेºयांत वाढ करण्यात यावी.त्यामुळे प्रवाशांना वाढलेल्या गाडीचा लाभ होईल. - वैशाली शिंगारे, प्रवासीमुंबईतील उत्पन्न मुंबईसाठीच वापरालोकलचे वेळापत्रक आॅक्टोबरमध्ये एक, दोन मिनिटे पुढे/मागे करून तेच वेळापत्रक प्रवाशांच्या माथी मारतात. कारण रेल्वे प्रशासनाची, बाहेरगावाहून मुंबईमध्ये येणाºया गाड्यांचे वेळापत्रक मुंबईतील लोकल वेळापत्रकाप्रमाणे बदलण्याची इच्छा नाही. मुंबईत येणाºया लोंढ्यांच्या प्रमाणात वाढीव लोकल नाहीत. उपनगरी लोकलचा विस्तार होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेºया कमी होत आहेत. नागरी वस्ती पनवेल, कर्जत, पेण आणि डहाणूपर्यंत विस्तारली आहे. जलद वाहतुकीला पर्याय निर्माण केले जात नाहीत. दोन लोकलमधील वेळ कमी केला पाहिजे. मुंबईतून मिळणारे उत्पन्न इतर ठिकाणी न वापरता, ते मुंबई विभागातील नवीन लोकल, फलाट दुरुस्ती, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली, विश्रांतीसाठी जादा यार्ड्स, यासाठी वापरावे. धिम्या मार्गावरील वाहतूक जलदमार्गावर वळविण्याची सोय करावी. त्यामुळे संकटसमयी लोकल एकामागोमाग न खोळंबता मार्ग बदलून मार्गक्रमण करीत राहतील. एखादा इमर्जन्सी ट्रॅक सदैव तयार करावा. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग एकमेकांशी जोडावेत. रात्रीच्या फेºया व वेळ उशिरापर्यंत वाढवावी. - राजन पांजरी, जोगेश्वरी