मुंबई :
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवर कुठे?वसई रोड ते वैतरणा अप - डाऊन मार्गावर कधी- शनिवारी रात्री ११. ५० ते रविवारी पहाटे २.५० वाजेपर्यंत अप मार्गावर तर १. ते ४. ३० डाउन मार्गावर परिणाम-याविरार-भरूच मेमू नियोजित वेळ ४. ३५ ऐवजी १५ मिनिटे उशिराने ४. ५० वाजता विरार येथून सुटणार आहे.मध्य रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक?माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च: डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर कुठे? पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर कधी - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत. मात्र, बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.