मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर १८ मे आणि १९ मे रोजी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात आल्याने दिवसकालीन ब्लॉक नसेल.मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.२६ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. दिवा ते परळ या स्थानकांदरम्यान या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. परळनंतर त्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील सर्व लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील.गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवापर्यंत चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक ५०१०३ दिवावरून चालविण्यात येईल. मेल, एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येईल. ती दादरहून दुपारी ३.४० वाजता सुटेल.हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाºया सकाळी ११.४० ते ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी, वडाळा रोडहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही.हार्बरच्या प्रवाशांसाठी विशेष लोकलरविवारी सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटीसाठी सुटणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगावहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्लाहून विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल. कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर १८ आणि १९ मे रोजी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येईल. बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान मध्यरात्री ११.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत चर्चगेट दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर आणि मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत विरार दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.