पार्सल तपासणीची सोय नसल्याने रेल्वेची सुरक्षा ‘राम भरोसे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:55 AM2018-05-09T05:55:38+5:302018-05-09T05:55:38+5:30
भारतीय रेल्वेतून दरमाह सुमारे १० कोटी टन माल (वस्तू) ने-आण करतात. तरी रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो, ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई - भारतीय रेल्वेतून दरमाह सुमारे १० कोटी टन माल (वस्तू) ने-आण करतात. तरी रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो, ते पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांवर कोणतेही पार्सल स्कॅन व तपासणीचे नियम अद्यापही प्रस्तावितच असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगण्यात आले. परिणामी, पार्सलच्या माध्यमातून घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने, रेल्वेची सुरक्षा ‘राम भरोसे’च असल्याचे निदर्शनास येते.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून मुंबईतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांवर पार्सल केला जाणारा माल (वस्तूला) सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची काय यंत्रणा आहे? याबाबत काय नियम आहेत, स्कॅनर लावण्याची जबाबदारी कोणाची? आदी माहिती आरटीआयअंतर्गत विचारली होती.
या संदर्भात पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यात मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली या स्थानकांवर पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची सध्या कोणतीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी वाणिज्य विभागाची असल्याचे आरटीआयमध्ये समोर आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्सल स्कॅन व तपासणीसाठी नियम आणि कायदा प्रस्तावित असल्याचेही समोर आहे.
मध्य रेल्वेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी तर या संदर्भातील माहिती देण्यास नकार दिला आहे. भारतीय रेल्वे दरमहा कोट्यवधी टन माल (वस्तू) पार्सल कोणतीही तपासणी किंवा स्कॅन न करता, अनेक रेल्वेगाड्यातून ने-आण करतात. त्यामुळे प्रशासनाच्या या त्रुटीचा गैरफायदा घेऊन, दहशतवादी संघटनेने कोणताही घातपात केल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात शेख यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र पाठवून, सर्व पार्सल केंद्रावर स्कॅनर लावण्याची, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य उपाययोजना हाती घेण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक...
च्मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरीवली या स्थानकांवर पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची सध्या कोणतीही व्यवस्था नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
च्मध्य रेल्वेच्या जनमाहिती अधिकाºयांनी तर स्थानकांवर पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासण्याची सध्या कोणतीही व्यवस्था आहे, या संदर्भातील माहिती देण्यासच नकार दिला.