मुंबईतील रेल्वे अधिकारी दिल्लीतील अधिकाऱ्यांची करतात दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:17 AM2019-06-08T01:17:32+5:302019-06-08T01:17:58+5:30

प्रवासी संघटनांचा आरोप : मुंबईतील लोकल आणि स्थानके चकाचक असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा

Railway officers in Mumbai are misguided by Delhi officials | मुंबईतील रेल्वे अधिकारी दिल्लीतील अधिकाऱ्यांची करतात दिशाभूल

मुंबईतील रेल्वे अधिकारी दिल्लीतील अधिकाऱ्यांची करतात दिशाभूल

Next

मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील रेल्वे अधिकाºयांना मुंबई लोकल सेवा उत्तम असल्याचे भासविले आहे. त्यामुळे दिल्लीतील वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांची दिशाभूल केली गेली असल्याचा आरोप प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून करण्यात आला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे विभागाचे निरीक्षण करण्यासाठी दिल्लीहून रेल्वे बोर्डाचे रोलिंग स्टॉकचे सदस्य राजेश अग्रवाल आले होते. या वेळी त्यांनी प्रथम श्रेणीच्या लोकल डब्यातून प्रवास केला. ते म्हणाले की, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक चकाचक आहेत. उपनगरीय लोकल मार्गावर सर्व नवीन लोकल चालविण्यात येतात. तिकीट दर योग्य असल्याचा दावा त्यांनी केला.
उपनगरीय लोकलमधून दररोज ९ ते १५ प्रवासी रेल्वे अपघातात मृत्यू पावतात. अनेक प्रवासी जखमी होतात. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक स्थानके आणि रेल्वे परिसर अस्वच्छ आहेत. मात्र तरीही रेल्वे प्रशासन म्हणते, रेल्वे चकाचक आहे. रेल्वेचे हे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रवासी नितेश लाड म्हणाले.

उपनगरीय लोकल अवेळी चालविण्यात येतात. अनेक लोकल रद्द होतात. परिणामी, याचा त्रास मुंबईकरांना होतो. लोकलच्या धक्काबुक्कीतून रेल्वे अधिकाºयांनी प्रवास करून दाखवावा, असा टोला प्रवासी मयूर पवार यांनी लगावला.

उपनगरीय लोकल मार्गावर अजूनही अनेक जुन्या प्रकारातील लोकल आहेत. तरीही अधिकाºयांकडून नवीन लोकल चालविण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्थानके, स्वच्छतागृहे वाईट अवस्थेत असूनदेखील रेल्वे स्थानके चकाचक असल्याचा खोटा दावा अधिकाºयांकडून केला जातो. अधिकाºयांनी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी लोकलमधून प्रवास करावा. मुंबईतील अधिकारी दिल्लीतील अधिकाºयांची दिशाभूल करीत आहेत. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

रेल्वे अधिकाºयाचा दावा
मुंबईतील रेल्वे स्थानके चकाचक, मुंबईत सर्व नवीन लोकल धावतात, यंदाच्या मान्सूनमध्ये लोकल सेवा ठप्प होणार नाही, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च २०२० पर्यंत प्रत्येकी ६-६ एसी, लोकलचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढविणार, लोकलमध्ये किंवा लोकल मार्गात तांत्रिक बिघाड झाल्यास, स्थानकावरील प्रवाशांसह लोकलमधील प्रवाशांना याची माहिती दिली जाईल., मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा कमी होणार., मुंबई ते बडोदा, पुणे, नाशिक मार्गावर पुढील आठवड्यात मेमूची चाचणी घेण्यात येईल.

Web Title: Railway officers in Mumbai are misguided by Delhi officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे