रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:22 AM2018-11-24T03:22:30+5:302018-11-24T07:26:03+5:30

रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे.

 Railway passengers torched for Sunday; Harbor line Megablock with Central Railway | रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक

Next

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सकाळी १० वाजून ३७ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद मार्गाने धावणाऱ्या सर्व लोकल दिवा आणि परळ या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील. तसेच सर्व स्थानकांवर थांबतील. ब्लॉकमुळे लोकलला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी १५ ते २० मिनिटांनी विलंब होईल.
रविवारी सकाळी १० वाजून ५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २२ मिनिटे यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरून सुटणारी डाऊन जलद, सेमी जलद लोकल नियमित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाºया आणि थांबणाºया सर्र्व धिम्या गाड्यांना स्थानकावर पोहोचण्यासाठी १० मिनिटांचा विलंब होईल. ब्लॉक काळात दादर, सीएसएमटी येथे येणाºया मेल, एक्स्प्रेस मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील.
पश्चिम रेल्वेवर रविवारी बोरीवली आणि गोरेगाव या ठिकाणी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर जम्बोब्लॉक असेल. यादरम्यान, बोरीवली आणि गोरेगाव या ठिकाणी ट्रॅक, सिग्नल, ओव्हरहेड वायरिंगचे काम करण्यात येईल. ब्लॉक काळात अप आणि डाऊन मार्गिकेवरील धिम्या मार्गावरील लोकल बोरीवली आणि गोरेगाव येथून जलद मार्गावरून धावतील. तसेच या काळात बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३, ४ वरून एकही लोकल धावणार नाही.

ठाणे ते वाशी/ नेरूळ लोकल वेळापत्रकानुसार
पनवेल ते नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत आणि नेरूळ/ बेलापूर ते खारकोपर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मात्र, या कालावधीत ठाणे ते वाशी/ नेरूळ येथील लोकल वेळापत्रकानुसारच धावणार आहेत.

Web Title:  Railway passengers torched for Sunday; Harbor line Megablock with Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.