Join us  

तुमच्यावर आहे रेल्वे पोलिसांची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:56 AM

‘आईज अँड एअर’ मोहीम; अनुचित घटना टाळण्यास होणार मदत.

मुंबई :  रेल्वेस्थानक परिसरात कोणताही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलिस आईज अँड एअर मोहीम राबविणार आहेत. त्यामध्ये रेल्वे कर्मचारी, कामगार यांच्याशी समन्वय ठेवला  जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.  मध्य आणि हार्बर रेल्वेवर एकूण २९२ फलाट आणि पश्चिम रेल्वेवर  १३६ फलाट  आहेत. प्रत्येक फलाटावर एक ते दोन जवान तैनात असतात. 

आवश्यक असल्याचे एमएसएफ जवान आणि  होमगार्डसची मदत घेतली जाते; परंतु  यासोबतच इतर घटकांचीही मदत आवश्यक आहे. त्यामुळे रेल्वे फलाटावर दररोज असणारे रेल्वे कर्मचारी किंवा इतर कामगार यांची मदत लोहमार्ग पोलिस घेणार आहेत. त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या तर ते लोहमार्ग पोलिसांना संपर्क करतील पुढील अनुचित घटना टळेल. 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेकडून आईज अँड एअर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये रेल्वे स्थानक परिसरात नियमित काम करणाऱ्यांशी समन्वय ठेवला जात आहे. त्यामुळे वेळोवेळी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे पोलिसांना मिळते. त्यामुळे अनुचित प्रकार टाळता येतो. - रवींद्र शिसवे, आयुक्त लोहमार्ग पोलिस

टॅग्स :मुंबईरेल्वेपोलिस