रेल्वे पोलिसांचा क्लास सुरू

By admin | Published: January 5, 2015 01:26 AM2015-01-05T01:26:03+5:302015-01-05T01:26:03+5:30

गुन्ह्यांचा शोध लागण्यात येणारा अडथळा, प्रवाशांशी सौजन्याची वागणूक, रेल्वे पोलिसांचे आरोग्य या आणि अन्य मुद्द्यांवर रेल्वे पोलिसांशी (जीआरपी) सुसंवाद घडविण्याचा निर्णय

Railway Police class continues | रेल्वे पोलिसांचा क्लास सुरू

रेल्वे पोलिसांचा क्लास सुरू

Next

मुंबई : गुन्ह्यांचा शोध लागण्यात येणारा अडथळा, प्रवाशांशी सौजन्याची वागणूक, रेल्वे पोलिसांचे आरोग्य या आणि अन्य मुद्द्यांवर रेल्वे पोलिसांशी (जीआरपी) सुसंवाद घडविण्याचा निर्णय रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार चर्चासत्रांचे आयोजन मुख्यालयात करण्यात येत आहे.
२0१४मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर एकूण २ हजार ७५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात मध्य रेल्वे मेन लाइन आणि हार्बरवर मिळून १ हजार ९९४, तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७६५ गुन्हे घडले आहेत. २0१३मध्ये तर (जानेवारी ते डिसेंबर) एकूण २ हजार ६७६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, कुर्ल्यात ४00 आणि ठाणे स्थानकात ३६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांचा शोध लागावा यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त प्रयत्नशील आहेत. यासाठी आयुक्तालयाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचा क्लास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले जाते. गुन्ह्यांचा तपास करताना खबरी वाढविण्यावर भर देणे, तपासकामात मदत करणाऱ्यांशी सौजन्याने वागणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे असे विषय चर्चासत्रात घेण्यात येतात.(प्रतिनिधी)

Web Title: Railway Police class continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.