खासदारांनी प्रशासनासमोर मांडल्या रेल्वे समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:48 AM2019-06-22T00:48:51+5:302019-06-22T00:49:58+5:30

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी घेतली पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट

Railway problems faced by MPs before the administration | खासदारांनी प्रशासनासमोर मांडल्या रेल्वे समस्या

खासदारांनी प्रशासनासमोर मांडल्या रेल्वे समस्या

googlenewsNext

मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित रेल्वे समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी चर्चगेट येथील रेल्वे मुख्यालयात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता व संबंधित रेल्वे अधिकारी यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली.

या बैठकीत गोरेगाव रेल्वे पूर्व बाजूस सरकते जीने बसवणे, दक्षिण बाजूस असलेला पादचारी उड्डाणपूल बांधणे व आरे सब-वे पर्यंत विस्तारीकरण करणे, पूर्व बाजूस असलेले आरक्षण कार्यालय गेले ६ महिने बांधून तयार आहे, त्यास कार्यान्वित करणे, उत्तर दिशेला असलेला पादचारी उड्डाणपूल विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, गोरेगाव व राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी जवाहरनगर येथील रेल्वे पादचारी उड्डानपुलाची दुरुस्ती करावी, गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर नवीन पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, हायमास्ट दिवे बसविणे, गोरेगाव-पनवेल हार्बर सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाइन विस्तारीकरणाची सद्यपरिस्थिती अवगत करण्यात यावी, गोरेगाव फलाट क्रमांक ४, ५, ६ व ७ येथे लिफ्ट बसविणे या विविध प्रलंबित समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. सदर समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन अनिलकुमार गुप्ता यांनी दिले. या बैठकीत या वेळी बहुसंख्य समस्यांवर अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अशी माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली. या बैठकीस गोरेगाव प्रवासी संघ व सबर्बन रेल्वे पॅसेंजर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Railway problems faced by MPs before the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.