Join us  

रेल्वे सुरक्षा दल बनले प्रवाशांचे जीवरक्षक; मध्य रेल्वेवर वर्षभरात वाचवले ८६ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 6:30 AM

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावत गेल्या वर्षभरात ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

मुंबई :

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावत गेल्या वर्षभरात ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झालेत. 

मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफ जवानांनी ‘मिशन जीवन रक्षक’अंतर्गत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीत आपद्ग्रस्त प्रवाशांचे प्राण वाचविण्याची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफ जवानांनी अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे अनेकदा निष्काळजीपणे वागतात. धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करताना काहींचा तोल जातो आणि ते जीव धोक्यात घालतात.  काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो.  आरपीएफ जवानाचे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक लक्ष ठेवतात.

३३    मुंबई विभाग      १७    भुसावळ विभाग१७    नागपूर विभाग१३     पुणे विभाग६    सोलापूर विभाग

टॅग्स :मुंबई लोकल